Ind vs Aus 4th Test Day 5 : रोहित 9, कोहली 5, राहुलचा भोपळा! टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार! पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात 3 मोठे धक्के, भारत जिंकणार?
Ind vs Aus 4th Test Day 5 : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे.

India vs Australia 4th Test Day 5 : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिले सत्र जिंकले आहे. आज सकाळी ऑस्ट्रेलियाची शेवटची जोडी फार काळ टिकू शकली नाही, यजमान संघ आपल्या दुसऱ्या डावात 234 धावा करून ऑलआऊट झाला. पण, त्यांच्या पहिल्या डावात 105 धावांची आघाडी घेत, ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Lunch on Day 5 of the 4th Test.
— BCCI (@BCCI) December 30, 2024
India lose three wickets with 33 runs on the board.
Scorecard - https://t.co/njfhCncRdL… #AUSvIND pic.twitter.com/2XzZpUG629
ज्याचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय संघाने 3 मोठे धक्के बसले आहे. पाचव्या दिवसाच्या उपाहारापर्यंत भारताने 26.1 षटकात 33/3 धावा केल्या आहेत आणि अद्याप विजयासाठी 307 धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला फक्त 7 विकेट्स घ्यायचे आहेत.
INDIA 33/3 ON DAY 5 LUNCH.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 30, 2024
- 65.5 overs left.
- Australia need 7 wickets.
- India need 307 runs. pic.twitter.com/CyFsW0knkt
कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल
कर्णधार रोहित शर्माच्या या दौऱ्यात शेवटच्या 4 डावात मधल्या फळीत खेळला, पण जेव्हा धावा झाल्या नाहीत. त्यामुळे तो पुन्हा सलामीला आला. मात्र, मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात 5 चेंडूत 3 धावा करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या डावात 40 चेंडू खेळले पण त्याला 9 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला मेलबर्नमध्ये रोहितच्या रूपाने पहिला धक्का बसला.
मोठ्या टार्गेटसमोर रोहित स्वस्तात आऊट झाला. विराट कोहलीची अवस्थाही तशीच होती. विराट क्रीझवर आल्यावर आशा होती, पण भारताची आशा तितक्याच लवकर भंगली. आज संघाला कोहलीकडून जबरदस्त खेळीच्या अपेक्षा होत्या, तेव्हा त्याच्या बॅटमधून फक्त 5 धावा आल्या. मेलबर्न कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली या माफक धावसंख्येवर मिचेल स्टार्कचा बळी ठरला.
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द धोक्यात
या संपूर्ण मालिकेत जेव्हा-जेव्हा भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, तेव्हा त्याने नाराज केले आहे. पहिला कसोटी सामना तो खेळू शकला नाही. त्याच्या पुनरागमनानंतर तो 3, 6, 10, 3 आणि आता 9 धावा करून परतला. या दौऱ्यावर रोहित शर्माला 5 डावात केवळ 31 धावा करता आल्या आहेत. सततच्या खराब कामगिरीमुळे आता त्याच्या कसोटी कारकिर्दीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
