BCCI Elections: बीसीसीआयला लवकरच नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार; 18 ऑक्टोबरला मुंबईत निवडणूक
BCCI Elections: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची येत्या 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत (Mumbai) वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
BCCI Elections: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची येत्या 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत (Mumbai) वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार अशा पाच पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार संभाळत आहेत. तर, जय शाह (Jah Shah) सचिव आहेत. या दोघांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय महत्वाचा ठरू शकतो. दरम्यान, सौरव गांगुली आणि जय शाह पुन्हा एकदा निवडणूक लढू शकतात.
बीसीसीआयच्या निवडणुकीसंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं 24 सप्टेंबरपासून इच्छुक अर्जदारांचे अर्ज मागवले आहेत. येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी उमेदवारी दाखल केले जातील. 13 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि त्याच दिवशी वैध नामांकनाची यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच 18 ऑक्टोबरला निवडणूक होईल आणि याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुली आणि सचिवपदावर जय शाह आणखी तीन वर्षे राहू शकतात, हे स्पष्ट झालं आणि भारतीय क्रिकेटच्या वर्तुळात आनंदाची लाट उसळली. भारतातल्या क्रिकेट संघटकांच्या चेहऱ्यांवर उमटलेला तो आनंद गांगुली आणि जय शाहांना मिळालेल्या तीन वर्षांच्या वाढीव टर्मसाठी नव्हता, तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानं सर्वांचाच राज्य संघटना आणि बीसीसीआयमध्ये मिळून सलग बारा वर्षे राहण्याचा मार्ग मोकळा झालाय. 18 ऑक्टोबरला निवडणुकीसोबतच होणाऱ्या एजीएमबाबतही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये आयसीसीच्या करासह आयसीसीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
एमसीएला माजी कसोटीवीर अध्यक्ष म्हणून लाभण्याची शक्यता
एमसीएची 28 सप्टेंबरला नियोजित आगामी निवडणूक दोन तीन आठवड्यांनी पुढं जाण्याची शक्यता होती. त्यामुळं अध्यक्षपदाच्या उमेदवारीविषयी निर्णय घेण्यासाठी पवार आणि शेलारांना आणखी अवधी मिळणार आहे. त्या दोघांचा कल हा संदीप पाटील यांच्याच बाजूनं कायम राहिला. तर, एमसीएला तब्बल तीसेक वर्षांनी एक माजी कसोटीवीर अध्यक्ष म्हणून लाभू शकतो.
हे देखील वाचा-