एक्स्प्लोर

IND vs AUS 2nd Test Playing 11 : ॲडलेडमध्ये अश्विन खेळणार, 3 खेळाडूंचा पत्ता कट? पिंक बॉल टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11

पिंक बॉलच्या कसोटीत भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? रोहित शर्माच्या ॲडलेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेनंतर परिस्थिती काही प्रमाणात स्पष्ट झाली आहे.

IND vs AUS 2nd Test Predicted Playing 11 : ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. आता प्रश्न असा आहे की टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार? रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर कर्णधारपदात बदल निश्चित आहे. पण, याशिवाय संघ व्यवस्थापन काय विचार करत आहे? दरम्यान, पर्थ कसोटीत प्लेइंग इलेव्हनमधून 3 खेळाडूंना वगळले जाण्याची शक्यता आहे. अश्विनही प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो.

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या पिंक बॉलच्या कसोटीत अश्विनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना बाद करून तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. एवढेच नाही तर त्याने ॲडलेडमध्ये एकूण 3 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ॲडलेडच्या नेटवरून सरावाच्या काही फोटो समोर आले आहेत, त्यातून अनेक संकेत मिळतात, ज्यामुळे अश्विनचा खेळण्याचा दावा बळकट होतो. त्याने आधी फलंदाजी केली आणि नंतर नेटमध्ये नितीश कुमार रेड्डीसोबत बराच वेळ गोलंदाजी केली.

गिल आणि रोहितचे पुनरागमन निश्चित

शुभमन गिल फिट असल्याची बातमी आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माप्रमाणे त्याचेही दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होण्याची खात्री आहे. बोटाच्या दुखापतीमुळे गिल पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतून बाहेर होता. आता प्रश्न असा आहे की या खेळाडूंच्या पुनरागमनाचा प्रश्न येतो तेव्हा संघाबाहेर कोण असेल? 

ॲडलेडमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाणाऱ्या खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची नावे असू शकतात. त्यांना वगळण्याचे कारण सोपे आहे की, संघातील वरिष्ठ खेळाडू त्यांचा फॉर्म आणि तंदुरुस्तीमुळे ॲडलेडला परतण्यास तयार आहेत.

पिंक बॉलच्या कसोटीत उतरण्यापूर्वी टीम इंडियासमोर सलामी जोडी आणि रोहित शर्मा यांच्या फलंदाजीच्या स्थितीबाबत मोठा प्रश्न होता. पण, सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहितने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, राहुल यशस्वीसोबत ओपनिंग करेल आणि तो स्वतः मधल्या फळीत खेळेल.

असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा, अश्विन, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

हे ही वाचा -

WTC मध्ये 72 तासांत गेम पलटणार! 3 दिवस अन् 6 टीममध्ये युद्ध, 2 टीमसाठी 'करो या मरो', नेमकं काय घडणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget