IND vs AUS, 2nd T20 Live : दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा 6 विकेट्सनी विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु तीन टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर आता दुसरा सामना पार पडत आहे.

Background
IND vs AUS, 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज तीन टी20 सामन्यांच्या (T20 Series) मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. टी20 विश्वचषकापूर्वी (ICC T20 World Cup 2022) होणारी ही मालिका दोन्ही संघासाठी एक प्रकारची रंगीत तालिम असणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास ऑस्ट्रेलिया मालिकाही 2-1 ने खिशात घालू शकते. दुसरीकडे भारतीय संघ (Team India) मात्र आजचा सामना जिंकून मालिकेती आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी20 सामना (IND vs AUS, 2nd T20) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर (Vidarbha Cricket Association Stadium) खेळवला जाणार आहे. या मैदानाच्या खेळपट्टीचा विचार करता हा पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. म्हणजेच आजही पहिल्या सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. दरम्यान दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. तर फिरकीपटू मिडल ओव्हर्समध्ये कमाल करु शकतात. भारताने या मैदानावर खेळलेल्या दोन्ही आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारत याठिकाणची विजयी मालिका कायम ठेवेल, की पहिल्या सामन्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया विजयश्री मिळवेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. भारतीय संघाचा विचार करता आज भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करु शकतो, तो उमेश यादवच्या जागी खेळू शकतो. तर नेमका संघ कसा असू शकतो पाहूया...
संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.




















