(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Aus 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत रोहित शर्मा दिसणार नव्या भूमिकेत, कर्णधाराचा मोठा निर्णय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू न शकलेला कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात ॲक्शन करताना दिसणार आहे.
India vs Australia 2nd Test : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकणारा भारतीय संघ आता 1-0 ने पुढे आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलियापेक्षा खूपच कमकुवत दिसत होती. या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा देखील भारतीय प्लेइंग 11 चा भाग नव्हता. कारण रोहित नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. भारतीय संघ हा सामना जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळला. रोहित आता ऑस्ट्रेलियात पोहोचला असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो ॲक्शन करताना दिसणार आहे.
केएल राहुलमुळे कर्णधार रोहित घेणार 'हा' मोठा निर्णय
रोहित शर्माकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित नव्या भूमिकेत दिसणार आहे. पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात त्याने आपल्या नव्या भूमिकेबाबत इशारा दिला आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदासोबतच तो फलंदाजीची सलामीची जबाबदारीही पार पाडतो. टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी रोहित शर्मावर आहे, मात्र मालिकेच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने टीम इंडियाची सलामी दिली. बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात असलेल्या केएल राहुलने सामन्याची सुरुवात करताना चांगली कामगिरी केली आणि टीम इंडियाला तुफानी सुरुवातही दिली.
रोहित शर्मा दिसणार नव्या भूमिकेत
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी केएल राहुलने सलामीवीर म्हणून खेळावे, अशी चर्चा सुरू झाली होती. तर रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. सराव सामन्यादरम्यानच रोहित शर्माने असे काही केले, ज्यामुळे चाहते खूप खुश झाले. या सामन्यात रोहित शर्माने केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांना सलामीला पाठवले आणि तो मधल्या फळीत फलंदाजीला आला. रोहितच्या या निर्णयानंतर 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल टेस्ट मॅचमध्येही असंच काही घडू शकतं, असं सगळ्यांना वाटत आहे. असे झाल्यास हा एक स्मार्ट निर्णय ठरू शकतो.
हे ही वाचा -
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम