एक्स्प्लोर

AUS vs IND 2nd ODI: दिवाळीत भारत अन् ऑस्ट्रिलिया पुन्हा भिडणार; कधी-कुठे रंगणार सामना?, पाहा A टू Z माहिती

रोहित शर्मा आणि विराट कोहली मार्चमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर सामना खेळण्यासाठी उतरले, पण दोघेही अपयशी ठरले.

Australia vs India 2nd ODI : रोहित शर्मा आणि विराट कोहली मार्चमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर सामना खेळण्यासाठी उतरले, पण दोघेही अपयशी ठरल्याने भारतीय चाहत्यांची अधिक निराशा झाली. हे दोघे मिळून केवळ 22 चेंडूच खेळपट्टीवर टिकू शकले. त्यातच अन्य फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केल्यामुळे भारताला यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 7 गडी राखून सरशी साधताना तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.

दुसरा सामना कधी आणि कुठे? (IND vs AUS 2nd ODI Time and Date)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही वनडे मालिका तीन सामन्यांची आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात तीन दिवसांचा विश्रांतीचा कालावधी आहे. दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. हा सामना अ‍ॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी 2 वाजता, तर भारतात सकाळी 9 वाजता सुरू होईल.

अ‍ॅडलेडमध्ये भारतीय संघाची कामगिरी

अ‍ॅडलेडमध्ये भारताने आतापर्यंत 15 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 9 सामने जिंकले, 5 हरले, आणि एक सामना श्रीलंकेविरुद्ध बरोबरीत सुटला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध इथला विक्रम थोडा कमजोर आहे, भारताने 2 सामने जिंकले असून 4 गमावले आहेत. भारतीय संघाला मालिकेत जिंवत राहण्यासाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. जर ऑस्ट्रेलिया दुसरा सामना जिंकला, तर ती मालिका आपल्या नावावर करेल. 

याआधी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत यजमानांनी विजय मिळवला होता. भारताने शेवटचा वेळ 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे मालिका जिंकली होती. त्यामुळे इतिहास पुन्हा घडवायचा असेल, तर उरलेले दोन्ही सामने भारताने जिंकणे गरजेचे आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)

शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.

भारतविरुद्ध वनडे मालिकेसाठीचा ऑस्ट्रेलियाचा संघ :  ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लाबुशेन, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, मिचेल ओवेन, जोश फिलिप (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, झेवियर बार्टलेट, जोश हेझलवुड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन.

हे ही वाचा -

Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
Embed widget