एक्स्प्लोर

सूर्याची गोल्डन डकची हॅट्रिक; मास्टर ब्लास्टर, कुंबळे यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटर्सनी रचलाय हाच विक्रम

IND vs AUS: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव सलग तिसऱ्या वनडेत गोल्डन डकवर आऊट झाला आहे. Suryakumar Yadav:

Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा (Team India) 21 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे तीन सामन्यांची मालिका टीम इंडियानं 1-2 नं गमावली आहे. पण या पराभवासोबतच टीम इंडियाची रॅकिंगही घसरली आहे. टीम इंडियाला (IND vs AUS) मागे टाकून ऑस्ट्रेलियानं वनडे रॅकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघ 49.1 षटकात 248 धावांवर गारद झाला. यावेळी विराट कोहलीनं 54 आणि हार्दिक पांड्यानं 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पानं चार खेळाडूंना बाद केलं. तसेच, अॅश्टन एगरलनंही दोन विकेट्स पटकावले. दरम्यान, टीम इंडियानं चार वर्षांनंतर मायदेशात वनडे सीरिज गमावली आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेली वनडे सीरिज सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) फारशी चांगली नव्हती. संपूर्ण सीरिजमध्ये सूर्याला आपली जादू काही दाखवता आली नाही. एवढंच नाहीतर सूर्यानं या सीरिजमध्ये एक अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला. सूर्या वनडे सीरिजमधल्या तिनही मॅचेसमध्ये झिरोवर आऊट झाला. म्हणजेच, या सीरिजमध्ये सूर्यानं 'गोल्डन डक'ची हॅट्रिक रचली आहे. 

सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा स्टार फलंदाज. टी-20 मध्ये तर सूर्याची बात काही औरच... टी-20 च्या रॅकिंगमध्ये सूर्याचा नंबर पहिला. पण वनडे मात्र सूर्याला आपली जादू दाखवता आलेली नाही. त्यानं गेल्या वर्षभरात टी-20 सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचलेत. मात्र, सूर्यकुमारनं वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही. भारतीय क्रिकेट संघ वनडे वर्ल्डकपसाठी तयारी करतोय आणि त्यामुळेच कर्णधार रोहित शर्मा मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला आजमावत असल्याचं बोललं जातंय. 

सूर्याची 'गोल्डन डक'ची हॅट्रिक

श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या मधल्या फळीसाठी फलंदाजाचा शोध सुरू झाला. अखेर सूर्याला संधी देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनानं घेतला. सूर्याला लागोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिनही सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, मात्र टी-20चा नंबर वन फलंदाज तिनही सामन्यात साधं आपलं खातंही उघडू शकला नाही. सूर्याची त्याच्या कारकिर्दीतील गोल्डन डकची ही पहिली हॅटट्रिक आहे. 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मुंबईत खेळला गेला, ज्यामध्ये सूर्याला मिचेल स्टार्कनं आतल्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला आणि त्या सामन्यातही मिचेल स्टार्कनं सूर्याला पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. काल (बुधवारी) चेन्नईत झालेल्या एकदिवसीय सामन्यातही सूर्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला. 

मास्टर ब्लास्टरच्याही नावे आहे 'गोल्डन डक'चा विक्रम 

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईत खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅस्टन अगरनं पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. सूर्या आऊट झाला अन् त्यानं 'गोल्डन डक'च्या हॅट्रिकचा विक्रम आपल्या नावावर रचला. मात्र, सूर्याच्या आधीही अनेक भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये गोल्डन डकची हॅट्रिक केली आहे. या यादीत सर्वात मोठं नाव आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जो 1994 मध्ये सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनीही वनडेत शून्यावर बाद होण्याची हॅट्ट्रिक रचली आहेच.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs AUS : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 21 धावांनी पराभूत, मालिकाही 2-1 ने गमावली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :   7 AM : 8 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 8 December 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  8 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Embed widget