(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND U19 vs ENG U19 Final: अंडर-19 विश्वचषक फायनल सुरु, इंग्लंडचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय
U19 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 विश्वचषकाचा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे.
U19 World Cup 2022: अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या (Under 19 WC) अंतिम सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामन्याला सुरुवात 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर (Sir Vivian Richards Stadium) खेळवला जाणार आहे. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरीत पाचव्या जगज्जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर आहे.
सामन्यासाठी अंतिम संघ
भारत: यश धूल (कर्णधार), अंक्रिश रघुवंशी, हर्नुर सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, कौशल तांबे, दिनेश बाणा, राज बावा, विकी ओस्तवाल, राजवर्धन हंगर्गेकर, रवी कुमार.
इंग्लंड: टॉम प्रेस्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जॉर्ज थॉमस, जेकब बिथेल, जेम्स ऱ्यू, विल्यम लक्स्टन, रेहान अहमद, अॅलेक्स हॉर्टन, जेम्स सेल्स, थॉमस स्पिनवॉल, जोशुआ बॉयडेन
अंडर-19 विश्वचषकामध्ये दोन्ही संघाची कामगिरी
अंडर-19 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघानं एकही सामना गमवला नाही. या दोन्ही संघांनी आपापल्या गटातील सर्व 3 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दोन्ही संघानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिलीय. यामुळं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.
- हे देखील वाचा-
- IND vs WI : टीम इंडियाची जर्सी मिळाल्यानंतर Deepak Hooda चा आनंद गगनात मावेना
- Australia Tour of Pakistan : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया जाणार पाकिस्तान दौऱ्यावर
- IND Vs WI: प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत बीसीसीआयकडून कोणतंही लेखी पत्र मिळालं नाही, सीएबी अध्यक्ष अविषेक डालमियाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha