Video : हनुमा विहारीला बाद करण्यासाठी आफ्रिकेच्या खेळाडूची अफलातून झेप, ही अप्रतिम कॅच पाहाच!
Ind vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताची सुरुवातीचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत.
Ind vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत. केवळ कर्णधार केएल राहुलने अर्धशतक झळकावलं पण त्यानंतर तोही बाद झाला. दरम्यान या सामन्यात विराट दुखापतीमुळे बाहेर असताना संधी मिळालेल्या हनुमा विहारीनेही विश्वासू सुरुवात केली होती. पण विहारीचा आफ्रिकेच्या डस्सेन याने एक अफलातून झेल पकडल्याने विहारी 20 धावा करुन तंबूत परतला. यावेळी रबाडा गोलंदाजी करत होता.
हनुमा विहारी क्रिजवर असताना कागिसो रबाडा सामन्यातील 39 वी ओव्हर टाकत होता. यावेळी विहारीने एका शॉर्ट चेंडूवर डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी त्याच्या बॅटला साईडकट लागत चेंडू डाव्या बाजूस गेला त्याचवेळी त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या व्हॅन डर डस्सेन याने एक अप्रतिम झेप टाकत अफलातून झेल पकडला. हा झेल पकडताना डस्सेन याचं हॅल्मेटही डोक्यातून खाली पडलं. पण यानंतरही त्याने झेल पकडल्याने सर्व संघाने मैदानावर त्याचं कौतुक केलं. पण विहारीची 53 चेंडूतील 20 धावांची संयमी खेळी मात्र संपुष्टात आली.
आतापर्यंत कसोटी
जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण भारताचे फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने भारताची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. केवळ कर्णधार राहुलने 50 धावा करत अर्धशतक झळकावलं पण त्यानंतर तोही बाद झाल्याने भारताची सामन्यातील स्थिती डळमळीत आहे. 157 धावांवर शार्दूल ठाकूर शून्यावर बाद झाल्यामुळे 157 वर भारताचे 7 गडी तंबूत परतले आहेत.
हे ही वाचा -
- IND vs SA : केएल राहुल भारताचा 34 वा कसोटी कर्णधार, म्हणतो 'हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न'
- Mohammad Hafeez Retires: पाकिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद हाफिजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
- IND vs SA : भारतापाठोपाठ दक्षिण आफ्रीकेनेही जाहीर केला एकदिवसीय संघ, टेम्बा बावुमाकडे कर्णधारपद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha