ENG vs IND, 1st ODI, Weather Report : आज भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना; पावसाचा व्यत्यय येणार का? जाणून घ्या हवामानाची स्थिती
ENG vs IND : भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांना सुरुवात करणार असून आजचा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
ENG vs IND : आज भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होणार आहे. टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्न करणार असून पहिला सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील वातावरण दररोज बदलत असल्याने कधीही पाऊस पडू शकतो. ज्यामुळे आजच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय येईल का? असे प्रश्न समोर येत असताना, हवामान विभागाच्या माहितीनुसार सामना होणाऱ्या मैदानाच्या परिसरात पावसाची चिन्ह नसल्यामुळे सामना वेळेत आणि संपूर्ण ओव्हर्सचा होईल. तर नेमकं लंडनच्या केनिंग्टन ओव्हल क्रिकेट मैदानाजवळील वातावरण आज अर्थात 12 जुलै रोजी कसं असेल जाणून घेऊया...
भारत आणि इंग्लंड यांच्यीतल आजचा सामना एकदिवसीय सामना असल्याने दोन्ही संघाना मिळून 100 षटक खेळण्याची संधी आहे. ज्यामुळे याठिकाणी पावसाचा व्यत्यय न आल्यास सर्व षटकांचा सामना होईल. अशामध्ये समोर येणाऱ्या माहितीनुसार या ठिकाणचं वातावरण साफ असल्याने पाऊस होण्याची शक्यता नाही. तापमान 31 अंश डिग्री सेल्सियश राहणार असून पाऊस नसल्यामुळे संपूर्ण षटकांचा सामना होणार आहे.
अशी जिंकली टी20 मालिका
आजपासून एकदिवसीय मालिका सुरु होत असून याआधी टी20 मालिका भारताने जिंकली आहे. इंग्लंड विरुद्ध भारत या टी20 मालिकेत पहिल्या सामन्यापासून भारताने आक्रमक आणि दमदार खेळ दाखवला. यावेळी पहिला सामना तब्बल 50 धावांनी भारताने जिंकत आधी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा सामना 49 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली. पण अखेरच्या सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देऊ शकला नाही. पण मालिका भारताने जिंकली.
हे देखील वाचा-