(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashes मध्ये बेन स्टोक्सचा जलवा दिसेनासा, माजी कर्णधार पॉटींग म्हणाला...
The Ashes : अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. दरम्यान इंग्लंड संघाचा मुख्य खेळाडू बेन स्टोक्स मात्र खास कामगिरी करत नसल्याने इंग्लंड संघ चिंतेत सापडला आहे.
Ricky Ponting on Ben Stokes : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटींग (Ricky Ponting) याच्या मते बेन स्टोक्समध्ये (Ben Stokes) यंदाच्या अॅशेस स्पर्धेत (The Ashes Test) आक्रमकता दिसून येत नाही. तो विरोधी संघाला कायम दबकून ठेवत असतो, पण यंदा तो सावध खेळ दाखवताना दिसत आहे. रिकीने बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूट, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी लवकर विकेट गमावल्याने त्याने यावर भाष्य करताना ही प्रतिक्रिया दिली. इंग्लंड सध्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे.
रिकी ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ शी बोलताना म्हणाला, ‘‘बेन यंदा अतिशय रक्षात्मक खेळताना दिसत आहे. तो नेहमीचा स्टोक्स दिसत नाही, त्याच्या नेहमीच्या खेळातून विरोधी संघ घाबरतात. पण आता तो सावध खेळ करत असून समोरही तगडे गोलंदाज असल्यानेही त्याचा खास फॉर्म दिसत नाही.''
''स्टोक्सने गोलंदाजांवर दबाव आणायला हवा''
पुढे बोलताना रिकी म्हणाला, ''स्टोक्सलाच सध्या इंग्लंडला संकटातून बाहेर काढावा लागेल. त्यासाठी त्याला त्याच्या खेळामध्ये थोडा बदल करावा लागेल. तो हातावर हात धरुन बसू शकत नाही, अशामध्ये तो गोलंदाजांवर दबाव टाकू शकत नाही. माझ्या मते जेवढ्या चांगल्या गोलंदाजासमोर तुम्ही खेळता, तितकाच रिस्क घेऊन तुम्हाला खेळावं लागतं.’’
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- अॅशेसवर कोरोनाचे सावट; इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफसह चौघांना कोरोनाची लागण
- IND vs SA 1st Test Score Live: पावसामुळं दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात लांबली
- Highest Paid Captain: क्रिकेटविश्वात सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार कोण? विराट कोहली कितव्या क्रमांकावर? पाहा संपूर्ण यादी
- Ashes : अॅशेस मालिकेत सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर?, सर डॉन ब्रॅडमननंतर 'या' खेळाडूंचा जलवा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha