IND vs SA 1st Test Score Live: सेंच्युरियनच्या मैदानात भारताने रचला इतिहास, 113 धावांनी विजय मिळवत मालिकेत घेतली आघाडी
IND vs SA 1st Test Score Live : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पाहा सामन्यातील महत्वाचे अपडेट्स
LIVE
Background
India vs South Africa 1st Test: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आजपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 'बॉक्सिंग डे' कसोटी सामना म्हणून ओळखला जाणार आहे. सेंच्युरियनवर हा सामना होणार आहे. मागील 29 वर्षांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया इतिहास रचणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडिया कोणाला देणार संधी?
पहिल्या कसोटीसाठी अंतिम संघ निवड करताना कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. खेळपट्टी पाहून टीम इंडिया पाच गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. यामध्ये चार जलदगती आणि एक फिरकीपटू असण्याची दाट शक्यता आहे.
टीम इंडियाकडून के.एल. राहुल आणि मयांक अग्रवाल सलामीची जोडी म्हणून येऊ शकतात. त्यांच्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा असतील. पाचव्या क्रमांकासाठी कोणाला संधी मिळणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी पाचव्या क्रमांकासाठी दावेदार आहेत. यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर फिरकीपटू आर. अश्विन याला संधी मिळू शकते. अश्विनवर अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी असणार आहे. त्याशिवाय, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना टीम इंडियात संधी मिळू शकते.
खेळपट्टी कशी असणार?
सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवसानंतर फलंदाजी करणे सोपं होईल असे म्हटले जात आहे. खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना चांगली मदत होईल. फिरकीपटूंना सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता 60 टक्के आहे.
भारताचा 113 धावांनी विजय
अखेरचा गडी आश्विनने बाद केला असून भार 113 धावांनी विजयी झाला आहे.
रबाडा बाद, भारताला विजयासाठी 1 विकेट बाकी
आश्विनने नववा गडी बाद केला असून आता विजयासाठी भारताला केवळ एक विकेट बाकी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा आठवा गडी बाद
दक्षिण आफ्रिकेचा आठवा गडीही तंबूत परतला आहे. मोहम्मद शमीने मार्को जेन्सनला बाद केलं असून भारताला विजयासाठी केवळ 2 विकेट्सची गरज आहे.
सेंच्युरियन कसोटीवर भारताची पकड, विजयासाठी तीन विकेटची गरज
पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने पकड मिळवली आहे. विजयासाठी भारतीय संघाला अवघ्या तीन विकेटची गरज आहे. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी तीन विकेट घेत सामन्यावर पकड मजबूत केली आहे. चौथ्या डावांत दक्षिण आफ्रिका संघाने सात गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या आहेत. विजयासाठी दक्षिण आफ्रिका संघाला 305 धावांचे आव्हान देण्यात आलं आहे.
चौथ्या दिवशीचा खेळ समाप्त, दिवसअखेर दक्षिण आफ्रिका 94/4
चौथ्या दिवशीचा खेळ संपला असून दिवस संपताना दक्षिण आफ्रिकेने 94 धावांच्या बदल्यात 4 गडी गमावले आहेत. आफ्रिकेला विजयासाठी 211 धावांची गरज आहे.