अॅशेसवर कोरोनाचे सावट; इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफसह चौघांना कोरोनाची लागण
Coronavirus in Ashes Series : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेवर कोरोनाचे सावट आहे.
![अॅशेसवर कोरोनाचे सावट; इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफसह चौघांना कोरोनाची लागण The Ashes two support staff and two family members of England team player found corona positive अॅशेसवर कोरोनाचे सावट; इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफसह चौघांना कोरोनाची लागण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/e0a2fd350109a778c13c0a4bab32b895_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus in Ashes Series : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेवर कोरोनाचे सावट आहे. अॅशेज मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास उशिरा सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, खेळाडूंच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली. इंग्लंड क्रिकेट संघाच्या तंबूत कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोनाबाधितांची नावे जाहीर केली नाहीत.
इंग्लंडच्या तंबूत कोरोनाने शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सर्व खेळाडूंचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सामन्यास सुरुवात करण्यात आली.
ऑस्ट्रेलियात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे ऑस्ट्रेलियात उपाययोजना आखल्या जात आहेत. अॅशेस मालिकेतही खबरदारी बाळगली जात असताना कोरोनाने शिरकाव केला आहे. इंग्लंड संघाशी संबंधित चौघांना कोरोनाची लागण झाली. तर, दुसरीकडे अॅशेस मालिकेच्या टीव्ही प्रक्षेपण करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अॅशेज मालिकेतील पाचव्या सामन्याचे ठिकाण बदलावे लागले आहे. शेवटचा कसोटी सामना 14 जानेवारीपासून होबार्टमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना दिवस-रात्र असणार आहे. याआधी हा सामना पर्थमध्ये होणार होता. मात्र, पश्चिम ऑस्ट्रेलियात कोविड-19 शी निगडित नियम आणि इतर कारणांमुळे सामन्याचे आयोजन पर्थ ऐवजी इतर ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ind vs SA: केएल राहुलकडे सचिन आणि विराटचा 'हा' विक्रम मोडण्याची संधी
- IND vs SA 1st Test : पहिला दिवस टीम इंडियाचा, के. एलच्या शतकासह भारताच्या दिवसअखेर 3 बाद 272 धावा
- Harbhaja Singh: हरभजन सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त; जाणून घ्या भज्जीची 23 वर्षांची कारकिर्द
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)