एक्स्प्लोर
IND vs SA : आजच्या सामन्यात 'या' दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंकडून भारताला धोका; विजय मिळवायचा असल्यास यांना रोखणं आवश्यक
IND vs SA : पहिल्या सामन्यात भारताने पराभव पत्करल्यानंतर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे.
![IND vs SA : आजच्या सामन्यात 'या' दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंकडून भारताला धोका; विजय मिळवायचा असल्यास यांना रोखणं आवश्यक In 2nd t20 Team miller dussen keshav maharaj this players are dangerous for team india IND vs SA : आजच्या सामन्यात 'या' दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंकडून भारताला धोका; विजय मिळवायचा असल्यास यांना रोखणं आवश्यक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/84a737562bf184c85dfd8e58f6b4ab49_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
David Miller
India vs South Africa, T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत पराभूत झाला. त्यामुळे आता आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तरी विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या तयारीत आहे. आजचा सामना कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून सर्वच खेळाडू दमदार खेळ करण्याच्या प्रयत्नात असतील. तर भारतीय संघाचा विचार करता नेमकं कोणत्या 5 खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल ते पाहूया...
- डेव्हिड मिलर - पहिल्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या डेव्हिड मिलरकडून भारतीय संघाला सर्वाधिक धोका आहे. मिलरने 31 चेंडूत नाबाद 64 धावा करत सामनावीराचा पुरस्कारही मिळवला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही त्याच्यापासून भारतीय गोलंदाजांना धोका आहे.
- रॅस्सी डस्सेन - पहिल्या सामन्या भारतीय संघाचं 212 धावांचं तगडं आव्हान पार करण्यात मिलरसोबत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या रॅस्सी डस्सेनने 46 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्यालाही आजच्या सामन्यात लवकर तंबूत धाडल्यास भारताला फायदा होईल.
- क्विंटन डी कॉक - संघातील अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक पहिल्या सामन्यात केवळ 22 धावाच करु शकला असला तरी त्याचा अनुभव आणि आयपीएलमधील कामगिरीमुळे तोही भारतीय संघासाठी एक मोठा धोका आहे.
- कागिसो रबाडा - फलंदाजीनंतर गोलंदाजीचा विचार करता कागिसो रबाडा एक मोठा धोका भारतीय फलंदाजांना आहे. रबाडाने आयपीएलमध्ये आतापर्यंत अतिशय दमदार कामगिरी केली आहे. आजही तो डेथ ओव्हरमध्ये भारताला धोका ठरु शकतो.
- केशव महाराज - गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतीय वंशाचा केशव महाराज एक मोठं आव्हान भारतीयांसाठी असेल. पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या ईशानलाही केशवनेच बाद केलं आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका उर्वरीत सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |
हे देखील वाचा-
- IND vs SA: मॅच बघायला जाताय की हाणामारी करायला? सामनादरम्यानचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ एकदा बघाच!
- कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण? फक्त सात जणांनाचं गाठता आलाय विक्रमी टप्पा
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातच चहलकडे विक्रम करण्याची संधी; घ्याव्या लागतील फक्त 3 विकेट्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)