एक्स्प्लोर

द्रविडने नकार दिला असता तर 'हा' माजी खेळाडू असता टीम इंडियाचा कोच!

Cricket Team India coach : राहुल द्रविड हे सुरुवातीला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चा होती.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाची 'द वॉल' अशी ओळख असणारे राहुल द्रविड आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. न्यूझीलँड दौऱ्यापासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीला नकार दिला असता टीम इंडियाच्या 'फॅब-5' मधील एक माजी खेळाडूला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली असती. बीसीसीआयने आपला प्लान-बी तयार ठेवला होता. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविड यांनी नकार दिला असता तर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असती. बीसीसीआयने याबाबत लक्ष्मण यांच्यासोबत चर्चाही केली होती. मात्र, काही मुद्यांवर बीसीसीआय आणि लक्ष्मण यांच्यात सहमती झाली नव्हती. मात्र, तरीदेखील बीसीसीआयने द्रविड यांनी नकार दिला असता तर प्लान-बी तयार ठेवला होता. 

'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. लक्ष्मण हे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बोर्डाच्या बॅकअप प्लानमध्ये होते. राहुल द्रविड यांनी नकार दिला असता तर लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी दिली असती. 

राहुल द्रविड हे सुरुवातीला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नव्हते अशी चर्चा होती. मात्र, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या अनेक चर्चानंतर राहुल द्रविड यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला. 

लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी

माजी कर्णधार राहुल द्रविडला (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक केल्यानंतर बीसीसीआयनं (BCCI) आणखी एका माजी खेळाडूला नवी जबाबदारी दिली आहे. राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षकाचं पद सांभाळल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमधील अध्यक्षपद रिकामं झालं होतं. या जागेवर आता माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही. एस लक्ष्मणची (vvs laxman) निवड करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एएनआयसोबत बोलताना गांगुलीनं लक्ष्मण एनसीएचं अध्यक्षपद सांभाळणार असल्याचं सांगितलं. भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर लक्ष्मण एनसीएची सुत्रे सांभाळण्याची शक्यता आहे.  लक्ष्मण भारत अ, अंडर-19 आणि एनसीएची जबाबदारी स्विकारण्याची शक्यता आहे. तर न्यूझीलंड दौऱ्यापासून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्विकारणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

IND A Vs SL A : भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video
भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video
IND A vs SL A : 4 धावा केल्या, पण स्कोअरबोर्डवर लागल्या 14! भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये मैदानावर नेमकं घडलं? क्रिकेटच्या विचित्र नियमाने उडाली खळबळ
4 धावा केल्या, पण स्कोअरबोर्डवर लागल्या 14! भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये मैदानावर नेमकं घडलं? क्रिकेटच्या विचित्र नियमाने उडाली खळबळ
Ind vs Sl Tri Nation A Series : भारत-श्रीलंका मॅचमध्ये वादग्रस्त कॅचवरून राडा! अख्या लंकेला एकट्या नडणाऱ्या सूर्यांशसोबत नेमकं काय घडलं?
भारत-श्रीलंका मॅचमध्ये वादग्रस्त कॅचवरून राडा! अख्या लंकेला एकट्या नडणाऱ्या सूर्यांशसोबत नेमकं काय घडलं?
Ind vs Pak Fight Video Fact Check : आधी गळा पकडला, नंतर धक्का दिला...; भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल! नेमकं काय सत्य?
आधी गळा पकडला, नंतर धक्का दिला...; भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल! नेमकं काय सत्य?

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Embed widget