एक्स्प्लोर

ICC World Test Championship Final: संघ ठरले, ठिकाण ठरलं अन् दिवसही; आता मैदान कोण मारणार? टीम इंडिया की, टीम ऑस्ट्रेलिया

ICC World Test Championship Final: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे.

ICC World Test Championship Final: क्रिकेटचा प्राण म्हणजे, कसोटी क्रिकेट (Test Cricket) अन् कसोटी क्रिकेटचा विश्वचषक (ICC WTC Final) म्हणजेच, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship). या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Team Australia)  एकमेकांसोबत भिडणार आहे. अशातच दोन्ही संघांचीही घोषणा झाली आहे. दोन्ही देशांनी WTCसाठी संघ जाहीर केले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय संघाची कमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियानंही आपल्या संघाची घोषणा केली असून कांगारूंनी संघाची कमान पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्याकडे सोपवली आहे.  

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

WTCसाठी टीम इंडिया 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. WTC अंतिम सामन्यात संघाची मदार रोहित शर्माकडे असणार आहे. WTC साठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय क्रिकेट संघात 5 वेगवान गोलंदाज, 3 फिरकीपटू, 1 यष्टिरक्षक आणि 6 फलंदाजांना संघात स्थान मिळालं आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणेला आयपीएल-2023 मधील त्याच्या शानदार कामगिरीचं बक्षीस मिळालं आहे. तब्बल 15 महिन्यांनंतर अजिंक्य टीम इंडियात पुनरागमन करत आहे.

भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनानं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरऐवजी टी20 चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला स्थान दिलं होतं. पण सूर्याला आपला फॉर्म दाखवता आला नाही. सलग तिन्ही सामन्यांत सूर्या गोल्डन डकवर आऊट झाला. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, सूर्याचा फ्लॉप शो त्यामुळे त्याऐवजी पर्याय म्हणून अजिंक्य रहाणेशिवाय दुसरा कोणताच दावेदार दिसत नाही, हेही तितकचं खरं आहे. 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

WTCसाठी टीम ऑस्ट्रेलिया 

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship 2023) फायनलसाठी ऑस्ट्रेलियानं संघांची घोषणा केली. ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया संघ टीम इंडियाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम मुकाबला होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या 17 खेळांडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियानं खेळाडूंची यादी (Australia Squad) जाहिर केला आहे. भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मॅट रेनशॉ, मार्कस हॅरिस आणि मिचेल मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे. 

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक लान्स मॉरिसला पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे. त्याला सहा आठवडे विश्रांतीची आवश्यकता आहे. त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ajinkya Rahane World Cup Team: श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, सूर्याचा फ्लॉप शो; वर्ल्डकपसाठीही टीम इंडियात अजिंक्य रहाणेची वर्णी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget