एक्स्प्लोर

Ajinkya Rahane World Cup Team: श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, सूर्याचा फ्लॉप शो; वर्ल्डकपसाठीही टीम इंडियात अजिंक्य रहाणेची वर्णी?

Ajinkya Rahane World Cup Team: अजिंक्य रहाणे 15 महिन्यांनंतर संघात परतला आहे. WTC साठी अजिंक्यचा टीम इंडियात समावेश करण्यात आलाय, पण वर्ल्डकपसाठीही अजिंक्यचा टीम इंडियात समावेश होण्याची शक्यता आहे.

Ajinkya Rahane World Cup Team: ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (ICC World Test Championship) च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचं तब्बल 15 महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. IPL 2023 मधील त्याच्या दमदार कामगिरीच्या आधारे रहाणेचं हे शानदार पुनरागमन झालंय असं म्हणता येईल. पण फक्त आयपीएलमध्येच (IPL 2023) नाहीतर अजिंक्यनं रणजीतही धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे पुन्हा फॉर्मात आलेल्या अजिंक्यची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या फायनलसाठी निवड करण्यात आली आहे. अशातच आता अजिंक्य यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वर्ल्डकपमध्येही खेळताना दिसू शकतो, असं बोललं जात आहे. 

अजिंक्य रहाणे 15 महिन्यांनंतर संघात परतला आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अय्यरच्या पाठीवर नुकतीच ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला मधल्या फळीत अनुभवी खेळाडूची गरज होती. टीम इंडियाची ही कमतरता भरुन काढण्यासाठी अजिंक्य रहाणे हा उत्तम पर्याय होता. अखेर रहाणेला प्राधान्य देत त्याचा WTC साठी संघात समावेश करण्यात आला. 

यंदा वर्ल्डकपचे आयोजन भारताकडे

अजिंक्य रहाणे यंदाच्या आयपीएलमध्ये फॉर्मात आहे. तो आयपीएलमध्ये आपली दमदार खेळी करत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षाखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठीही अजिंक्यचा समावेश टीम इंडियात होऊ शकतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर अय्यरनं सुमारे 3 महिने विश्रांती घेतील. यानंतर त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागेल. अशा परिस्थितीत अय्यर वर्ल्डकपमधूनही बाहेर रहाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. भारतीय संघाला पुन्हा एकदा मधल्या फळीत मजबूत खेळाडूची गरज भासणार आहे. त्यामुळे तिथेही अजिंक्य रहाणेची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 

विश्वचषकापूर्वी अजिंक्यच्या पदरी अनेक संधी 

भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनानं काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरऐवजी टी20 चा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला स्थान दिलं होतं. पण सूर्याला आपला फॉर्म दाखवता आला नाही. सलग तिन्ही सामन्यांत सूर्या गोल्डन डकवर आऊट झाला. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, सूर्याचा फ्लॉप शो त्यामुळे त्याऐवजी पर्याय म्हणून अजिंक्य रहाणेशिवाय दुसरा कोणताच दावेदार दिसत नाही, हेही तितकचं खरं आहे. 

टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही मालिका खेळायची आहे. यासोबतच आशिया कप स्पर्धाही याच वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत श्रेयस आणि सूर्यानं जर स्वतःला सिद्ध केलं तर मात्र अजिंक्यच्या अडचणी नक्कीच वाढतील. पण यादरम्यान अजिंक्यला आपली ताकद दाखवण्याची संधी नक्की मिळणार आहे, या शंकाच नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अजिंक्य रहाणेला फक्त IPL मुळे संघात स्थान मिळाले नाही... रणजीमध्ये धावांचा पाडलाय पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget