एक्स्प्लोर

Points Table : इंग्लंडच्या विजयाचा भारताला फायदा, रोहितसेना चौथ्या क्रमांकावर, पाहा लेटेस्ट अपडेट

World Cup 2023 points table : विश्वचषकात मंगळावारी चाहत्यांसाठी दोन सामन्याची मेजवानी होती.

World Cup 2023 points table : विश्वचषकात मंगळावारी चाहत्यांसाठी दोन सामन्याची मेजवानी होती. इंग्लंड आणि बांगलादेश  (ENG vs BAN) पहिला सामना झाला तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यामध्ये पार पडला. इंग्लंड आणि पाकिस्तान संघाने विजय मिळवला. तर बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. होय, इंग्लंडचा विजय झाल्यामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत एका स्थानाने झेप घेतली आहे. त्याशिवाय पाकिस्तान संघाने दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पक्के केले आहे.  पाहूयात गुणतालिकेतील सध्याची स्थिती नेमकी कशी आहे. 

न्यूझीलंड अव्वल, पाकिस्तान दुसरा -

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने विश्वचषकातील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. पण न्यूझीलंड संघाने दोन्ही सामन्या मोठ्या फरकाने बाजी मारली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. परिणामी चार गुणांसह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. पहिल्याच सामन्यात 400 धावा चोपणारा दक्षिण आफ्रिका संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका संगाचे नेटरनेरट + 2 पेक्षा जास्त आहे.

इंग्लंडच्या विजयचा भारताला फायदा - 

मंगळवारी भारताचा सामना नव्हता, तरीही भारताला गुणतालिकेत फायदा झाला आहे. इंग्लंडने बांगलादेशचा पराभव करत विश्वचषकातील विजयाचे खाते उघडले. बांगलादेशचा पराभव झाल्यामुळे भारतीय संघ पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता भारतीय संघ चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ दोन सामन्यात एक विजय एक पराभवासह पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेश संघालाही एक विजय आणि एक पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेचं खातेच उघडले नाही - 

पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि एक वेळा चषक उंचावणारा श्रीलंका यांना विजयाचे खाते अद्याप उगडता आले नाही.  ऑस्ट्रेलियाचा संघ सातव्या स्थानावर आहे. तर श्रीलंका संघाला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघ आठव्या स्तानावर आहे. अफगाणिस्तान नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानावर आहे. नेदरलँड संघालाही दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 

संघ सामने विजय पराभव गुण  नेटरनरेट
1. New Zealand 2 2 0 4 +1.958
2. Pakistan 2 2 0 4 +0.927
3. South Africa 1 1 0 2 +2.040
4. India 1 1 0 2 +0.883
5. England 2 1 1 2 +0.436
6. Bangladesh 2 1 1 2 -0.561
7. Australia 1 0 1 0 -0.883
8. Sri Lanka 2 0 2 0 -1.161
9. Afghanistan 1 0 1 0 -1.438
10. Netherlands 2 0 2 0 -1.800
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
Ind vs Pak: आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत-पाक सामन्यावरुन ठाकरेंचा संताप, शिवसैनिकांना आदेश
आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत-पाक सामन्यावरुन ठाकरेंचा संताप, शिवसैनिकांना आदेश
Beed Crime Ex deputy sarpanch death: आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
आधी पूजानं टाळलं, तिच्या आईलाही आली नाही दया, गोळी झाडण्याआधी गोविंदचा फोन; खळबळजनक माहिती समोर
Embed widget