एक्स्प्लोर

AFG vs PAK : तीन खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तानची माघार; PCB चा मोठा डाव, तिरंगी मालिकेसाठी नव्या संघाची घोषणा; नाव ऐकून थक्क व्हाल

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

Pakistan-Afghanistan War Update : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही दिसू येत आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा  (3 Cricketers Die In PAK Airstrike) मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून (Tri-Series) माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये खेळली जाणार होती. त्यात यजमान पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ सहभागी आहेत.

अफगाणिस्तानची माघार, PCB चा मोठा डाव (Afghanistan's withdrawal tri-series in Pakistan)

अफगाणिस्तानच्या माघारीनंतर केवळ एका दिवसात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नव्या तिसऱ्या संघाची घोषणा केली आहे. आता झिम्बाब्वे (Zimbabwe named replacement in T20I tri-series in Pakistan) हा संघ अफगाणिस्तानच्या जागी या टी-20 तिरंगी मालिकेत खेळणार आहे. ही मालिका 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी दिली. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या कथित हवाई हल्ल्यात आपल्या तीन खेळाडूंचा मृत्यू झाल्याचं सांगत, या मालिकेसाठी संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. रावळपिंडीमध्ये सुरू होणाऱ्या या मालिकेत श्रीलंका हा तिसरा संघ असेल.

झिम्बाब्वेचा सहभाग जाहीर करताना PCB ने सांगितले की, “अफगाणिस्तानने या स्पर्धेत सहभागी होण्यास असमर्थता दर्शवली आहे.” पीसीबीच्या निवेदनात म्हटले आहे, “झिम्बाब्वे क्रिकेटने 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे होणाऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय त्रिकोणी मालिकेसाठी आमंत्रण स्वीकारले आहे. या स्पर्धेत श्रीलंका देखील सहभागी होणार आहे.”

ही तिरंगी मालिका 17 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला जाईल. दुसरा सामना 19 नोव्हेंबरला होणार असून त्यात श्रीलंका झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार आहे. रावळपिंडीतील दोन सामन्यांनंतर उर्वरित सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळले जातील. या मालिकेचा अंतिम सामना 29 नोव्हेंबरला लाहोरमध्ये रंगणार आहे.

पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे तिरंगी मालिकेचे वेळापत्रक

  • 17 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  • 19 नोव्हेंबर - श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
  • 22 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 23 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 25 नोव्हेंबर - श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 27 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  • 29 नोव्हेंबर - अंतिम सामना, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

हे ही वाचा -

Aus vs Ind 1st ODI : 3 वेगवान गोलंदाज, 2 फिरकीपटू तर.... पहिल्या वनडेमध्ये ही असणार टीम इंडियाची प्लेइंग-11, नितीश कुमार रेड्डीचं पदार्पण!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget