ICC Test Rankings : अश्विन-जाडेजाचा कसोटी क्रमवारीत दबदबा, रोहित शर्माचीही मोठी झेप
Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे.
![ICC Test Rankings : अश्विन-जाडेजाचा कसोटी क्रमवारीत दबदबा, रोहित शर्माचीही मोठी झेप icc test rankings ravindra jadeja ravichandran ashwin on top rohit sharma highest tanked indian batsman ICC Test Rankings : अश्विन-जाडेजाचा कसोटी क्रमवारीत दबदबा, रोहित शर्माचीही मोठी झेप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/15/973d1e1be4a787c4b5d46e0cc19eceaf1689407592963428_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे. ताज्या रॅकिंगमध्ये आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांचा दबदबा आहे. तर फलंदाजीत रोहित शर्माला फायदा झालाय. फलंदाजीत रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर पोहचलाय. आघाडीच्या दहा फलंदाजामध्ये रोहित शर्मा एकमेव भारतीय फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रविंद्र जाडेजा अव्वल स्थानावर आहे तर गोलंदाजीत आर. अश्विन पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल 73 व्या क्रमांकावर आहे. त्याचे 420 रेटिंग गुण आहेत. यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिजविरोधात कसोटीत पदार्पण केले होते, पहिल्याच सामन्यात यशस्वी जयस्वालने दीडशतकी खेळी केली होती.
फलंदाजीत कोण आघाडीवर?
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. आघाडीच्या दहा फलंदाजामध्ये रोहित शर्मा एकमेव भारतीय फलंदाज आहे. रोहित शर्मा दहाव्या क्रमांकावर आहे. मागील सात ते आठ महिन्यापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या ऋषभ पंतच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. तो टॉप 10 बाहेर गेलाय.
गोलंदाजीत काय स्थिती ?
भारताच्या आर. अश्विन याचा गोलंदाजीत दबदबा कायम आहे. 884 रेटिंग गुणांसह अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा तिसऱ्या स्थानावर आहे. जेम्स अँडरसन चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी पाचव्या स्थानावर आहे.
अष्टपैलूमध्ये जाडेजाचा दबदबा -
अष्टपैलू खेळाडूमध्ये रविंद्र जाडेजाचा दबदबा कायम आहे. 449 रेटिंग गुणांसह रविंद्र जाडेजा पहिल्या स्थानावर आहे. तर 362 गुणांसह आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानावर आहे. बेन स्टोक्स चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय अष्टपैलू अक्षर पटले पाचव्या स्थानावर आहे. अक्षर पटेलचे 303 रेटिंग गुण आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. अश्विन, यशस्वी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी दमदार कामगिरी करत विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)