एक्स्प्लोर

ICC Test Ranking | विराटचं रँकिंग घसरलं, तर अश्विन-बुमरा फायद्यात

ICC Test Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर चषकात विराट कोहली तीन सामन्यात खेळला नाही. परिणामी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट पाच वर्षात पहिल्यांदाच टॉप 3 मधून बाहेर झाला आहे. तर अश्विन आणि बुमराच्या रँकिंगमध्ये मात्र सुधारणा झाली आहे.

ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर फलंदाज आणि गोलंदजांची क्रमवारी जारी केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं नुकसान झालं आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहली मागील पाच वर्षांत पहिल्यांदाच टॉप 3 मधून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानी कायम आहे.

न्यूझीलंडचा केन विल्यमसन 919 अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर स्टीव स्मिथच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. स्मिथकडे 891 अंक असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत शतक करणाऱ्या मार्नस लाबुशेनच्या अंकांमध्ये सुधारणा झाली आहे. विराट कोहलीला मागे टाकून लाबुशेनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लाबुशेनचे 878 अंक असून विराट कोहलीचे 862 अंक आहेत. परिणामी विराट चौथ्या स्थानावर घसरला आहे.

ICC टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडिया अव्वल; इंग्लंड कसोटीनंतर अंतिम सामन्याबाबत निर्णय

श्रीलंकेविरुद्ध दुहेरी शतक करणारा जो रुट आता पाचव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर भिंत बनून उभा राहिलेला चेतेश्वर पुजारा सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय बेन स्टोक्स आठव्या स्थानी आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्त्व करणारा अजिंक्य राहणे नवव्या क्रमांकावर असून हेन्री निकोलस दहाव्या स्थानी आहे.

— ICC (@ICC) January 20, 2021

अश्विन-बुमराला फायदा बॉर्डर-गावस्कर चषकात मालिकावीर ठरलेला पॅट कमिन्स गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. कमिन्सचे 908 अंक आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉड 847 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. नील वॅगनर तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा आर अश्विन आणि जसप्रीत बुमराने टॉप 10 गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे. अश्विन आठव्या तर जसप्रीस नवव्या स्थानावर पोहोचले आहेत.

Ind vs Aus | भारतीयांना कमी लेखण्याची चूक कधीही करु नका, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांचं सूचक वक्तव्य 

याशिवाय कसोटी मालिकेतील विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. ऑस्ट्रेलिया मागे टाकत भारताने कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थान मिळवलं आहे. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. म्हणजेच कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचाच दबदबा कायम आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकारSharad Pawar  on Anil Deshmukh :  अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget