Brett Lee: टीम इंडिया सेमिफायनलमध्ये पोहोचू शकते, पण.. : ब्रेट ली
Brett Lee: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची भारतीय संघात क्षमता आहे, पण त्यासाठी त्यांना पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल, असे ब्रेट लीचे मत आहे.
![Brett Lee: टीम इंडिया सेमिफायनलमध्ये पोहोचू शकते, पण.. : ब्रेट ली ICC t20 world cup brett lee team india bhuvneswar kumar hardik pandya Brett Lee: टीम इंडिया सेमिफायनलमध्ये पोहोचू शकते, पण.. : ब्रेट ली](https://wcstatic.abplive.in/en/prod/wp-content/uploads/2017/10/6498gallery-image-642464494.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Brett Lee on Team India: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला, की भारतीय संघात टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याची क्षमता आहे. पण, त्यासाठी त्यांना पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल. म्हणजेच हार्दिक पांड्याला गोलंदाजी करावी लागेल आणि भुवनेश्वर कुमारला वेग वाढवावा लागेल.
पीटीआयशी विशेष संवाद साधताना ब्रेट लीने भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाविषयी चर्चा केली. तो म्हणाला, की पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभूत झाले असले तरी भारत पुनरागमन करू शकतो. पांड्याच्या संघातील भूमिकेबाबत तो म्हणाला, 'भारतीय संघ तेव्हाच मजबूत असतो जेव्हा हार्दिक पांड्या गोलंदाजी करतो, जर तो तंदुरुस्त असेल तर. आणि फिट नसेल तर भारतीय संघाला विविध पर्यायांचा विचार करावा लागेल. पण तो अष्टपैलू म्हणून संघात असावा असे माझे मत आहे.
'भुवनेश्वरला वेग वाढवावा लागेल'
भुवनेश्वरबाबत तो म्हणाला, की 'भुवनेश्वरचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. जगातील फार कमी वेगवान गोलंदाज हे करू शकतात. या खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्यासाठी त्याला ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करावी लागेल. त्याला वेग पकडावा लागेल आणि विविधताही हवी.
तो म्हणाला, "पाकिस्तानविरुद्ध अनेक प्रयोग केले, पण ते अयशस्वी झाले. तो तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा तो चेंडू गुडघ्यापर्यंत पोहोचवतो ज्यामध्ये फलंदाजाला विकेटच्या आधी किंवा मागे पायचीत होण्याची शक्यता असते. ली म्हणाला की, मोहम्मद शमी टी-20 क्रिकेटमध्ये इतका यशस्वी आहे कारण तो कसोटी सामन्याच्या लेंथने गोलंदाजी करतो. तो म्हणाला, 'कसोटी सामन्याची लेंथ, म्हणजेच पूर्ण लेंथ आणि गुड लेंथमधील चेंडू. माझा विश्वास आहे की चेंडूने सुरुवातीच्या षटकांमध्ये कसोटी सामन्याच्या लेंथच्या चेंडूतून यश मिळते.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरला मिळालेल्या वागणुकीचाही त्याने निषेध केला. “मी संपूर्ण आयपीएलमध्ये त्याचा बचाव केला कारण त्याला खूप वाईट वागणूक मिळाली. त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले गेले नाही आणि स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला नाही. ऑरेंज कॅपधारकाला अशी वागणूक दिली जात नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)