Kevin Pietersen On Team India: 'खेळाडू रोबोट नाहीत, त्यांना पाठिंब्याची गरज' भारतीय संघाच्या समर्थनार्थ केविन पीटरसनचे हिंदीत ट्विट
Kevin Pietersen On Team India: भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळे भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
ICC T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकात भारताकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळे भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. दरम्यान, भारताचे आजी-माजी खेळाडू भारताच्या कामगिरीवर नाराजी दाखवत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen) भारताचे समर्थन केलंय. "खेळाडू रोबोट नाहीत, त्यांना पाठिंब्यांची गरज आहे", असे केविन पीटरसनने ट्विटमध्ये म्हटलंय. विशेष म्हणजे, केविन पीटरसनने हे ट्वीट हिंदी भाषेत केलंय.
केविन पीटरसनने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "खेळात एका संघाचा विजय होतो. तर, दुसऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागतो. कोणताच खेळाडू पराभूत होण्यासाठी मैदानात उतरत नाही. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे, हे प्रत्येक खेळाडूसाठी सन्मानजनक असते. परंतु, खेळाडू रोबोट नाहीत, त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे."
केविन पीटरसनचे ट्वीट-
भारताने सलग दोन सामने गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेलाय. पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव पत्कारावा लागल्याने भारताचे उपांत्य फेरीत गाठण्याचा आशा धुसूर झाल्यात. भारताला एखादा चमत्कारच उपांत्य फेरीत पोहचवू शकतो. भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलॅंड आणि नामीबिया संघाविरुद्ध होणार आहेत. या सामन्यांत भारताला मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. एवढेच नव्हेतर, न्यूझीलंडला अफगाणिस्तानविरुद्ध छोट्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तर, नामीबिया आणि स्कॉटलँड या दोन्ही संघाला न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार आहे. हे समीकरण अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की
संबंधित बातम्या-