5 Reasons of for Team India Defeat : टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; 'या' 5 चुका कारणीभूत
टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडचा ८ गडी राखून विजय, भारताच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात
![5 Reasons of for Team India Defeat : टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; 'या' 5 चुका कारणीभूत IND vs NZ ICC T20 World Cup 5 Reasons of for Team India Defeat 5 Reasons of for Team India Defeat : टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; 'या' 5 चुका कारणीभूत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/c78efe25016160b30a8b7ef2b8e7e185_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
5 Reasons of for Team India Defeat: ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 8 विकेट्सनी लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. भारतानं दिलेलं 111 धावांचं माफक आव्हान किवी फलंदाजांनी पंधराव्या षटकातच पार केलं. पाकिस्तानपाठोपाठ याही सामन्यात भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरली. चौथ्या षटकात बुमरानं गप्टिलला माघारी धाडलं. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीच्या डॅरी मिशेलनं 72 धावांची भागीदारी साकारली. बुमराच्याच गोलंदाजीवर मिशेल 49 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विल्यमसननं डेवॉन कॉनवेच्या साथीने विजयाचं सोपस्कार पूर्ण केले. विल्यमसननं नाबाद 33 धावांची खेळी केली.
वाचा : India, T20 WC Standings: ...तरीही भारत गाठू शकतो उपांत्य फेरी, जाणून घ्या यामागचे समीकरण
सलग दुसऱ्यांदा नाणेफेक हरलो : या विश्वचषकात नाणेफेक जिंकण खूप महत्त्वाचा ठरतोय. आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा पहिल्यादा गोलंदाजी करणारा संघ जिंकलेला पाहायला मिळाला आहे. कालच्या सामन्यातही न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात विराट कोहली सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमवावा लागलाय. दुबईमध्ये दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतोय ज्यामुळे फलंदाजी करणे सोपे होते.
इशान किशन आणि शार्दुल ठाकूर फेल : भारताने या सामन्यात दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला संधी देत रोहित शर्माच्या जागी त्याला सलामीला पाठवण्यात आले. पण ट्रेंट बोल्टने सामन्याच्या तिसर्या षटकाच्या 5व्या चेंडूवर इशान किशनला वैयक्तिक 4 धावांवर माघारी धाडले. तर दुसरीकडे भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. त्यानेही निराशा केली. शार्दुल ठाकूरला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.
राहुल-रोहित-कोहली अपयशी : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रोहितने अॅडम मिल्नेला एक चौकार आणि एक षटकार ठोकत मोठी खेळी खेळण्याचे संकेत दिले. पण ईश सोधीच्या शॉर्ट पिच बॉलवर झेलबाद केला. तर पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणारा कर्णधार विराट कोहली तीन विकेट पडल्यानंतर दडपणाखाली आला. कोहलीने इश सोधीच्या चेंडूवर मिडविकेटवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तो झेलबाद झाला. तर सालामीचा फलंदाज केएल राहुलला देखील अद्याप चांगला खेळ करता आलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो अवघ्या 18 धावा करून बाद झाला.
डॉट बॉल : भारतीय फलंदाजांनी 54 डॉट बॉल खेळले. संपूर्ण सामन्यात भारत फक्त 8 चौकार आणि 2 षटकार मारण्यात यशस्वी ठरला. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर भारतीय फलंदाजांनी सरळ 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला.
किवींच्या फिरकीपटूंविरुद्ध धावा करता आल्या नाहीत : ईश सोधी आणि मिचेल सॅटनर या जोडीने भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. दोघांनी 8 षटके टाकली आणि फक्त 31 धावा दिल्या. या जोडीने 2 विकेट्सही घेतल्या. भारतीय फलंदाजांकडे सोढी आणि सेटनरचा कसा सामना करायचा याचा कोणताही विचार नव्हता. त्यामुळे भारतीय फलंदाजांना किवींच्या फिरकीपटूंविरुद्ध मोठ्या धावा करता आल्या नाहीत.
वाचा : IND Vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)