(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC T20 WC 2021: भारताचा नामिबीयावर 9 विकेट्स राखून विजय
ICC T20 WC 2021: टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा शेवट गोड झालाय. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा करणार आहेत. या दौऱ्यात 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने जाणार आहे.
ICC T20 WC 2021, IND vs NAM: टी-20 विश्वचषकाच्या 42 सामन्यात भारतीय संघानं नामिबिया संघाला (India Vs Nambia) धूळ चाखली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबियाच्या संघ डगमगताना दिसला. नामिबियानं या सामन्यात 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. नामिबियाच्या संघाने दिलेलं लक्ष्य भारतानं 1 विकेट गमावून 15.2 व्या षटकातच पूर्ण केलंय. (ICC T20 WC 2021: India won the match by 9 wickets against Nambia match 42 at Dubai International Stadium)
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी नामिबियाकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या स्टीफन बार्ड (21 बॉल 21 धावा), मायकेल व्हॅन लिंजेन (15 बॉल 14 धावा), क्रेग विल्यम्स (4 बॉल 0 धाव), गेरहार्ड इरास्मस (20 बॉल 12 धावा), डेव्हिड विसे (25 बॉल 26 धावा), जेजे स्मित (9 बॉल 9 धावा), झेन ग्रीन (1 बॉल 0 धाव) , जॅन फ्रायलिंक (15 बॉल 15 धावा, नाबाद), जॅन निकोल लोफ्टी-ईटन (5 बॉल 5 धावा) आणि रुबेन ट्रम्पेलमन 6 बॉलमध्ये 13 धावा केल्या. ज्यामुळे नामिबियाच्या संघाला 132 धावा करता आल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी तीन- तीन विकेट्स मिळाल्या. तर, जसप्रीत बुमराहने एक विकेट्स घेतली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहीत शर्मा (37 बॉल 56 धावा), केएल राहुल (36 बॉल 54 धावा नाबाद) आणि सुर्यकुमार यादवनं नाबाद 25 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघाला 15.2 षटकातच विजय मिळवता आलाय. नामिबियाच्या संघाकडून जॅन फ्रायलिंकला एक विकेट्स घेता आलीय.
टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा शेवट गोड झालाय. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी-20 सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
हे देखील वाचा-
- Shoaib Akhtar in Trouble: लाईव्ह टीव्ही शो सोडणं शोएब अख्तरच्या अंगलट, पीटीव्ही चॅनेलनं ठोकला 10 कोटींचा दावा
- ICC T20 WC 2021, IND vs NAM Preview: भारत- नामिबिया आज आमने-सामने, दुबई आंतराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगणार सामना
- #BreakingNews : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर, Pakistan Cricket बोर्डाची माहिती