T20I Rankings: पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी, आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठी झेप
T20I Rankings: आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं पाकिस्तानचा (IND vs PAK) 8 विकेट्सनं विजय मिळवला.
ICC T20I Rankings: आशिया चषकातील (Asia Cup 2022) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं पाकिस्तानचा (IND vs PAK) 5 विकेट्सनं पराभव केला. भारताच्या या विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरी बजावली. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणूनही गौरवरण्यात आलं. या कामगिरीमुळं हार्दिक पांड्याला आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठा फायदा झालाय. त्यानं आयसीसी टी-20 क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतलीय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचा खिताब जिंकला. त्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्यानं पहिल्या चेंडूवर 25 धावांत तीन विकेट्स घेतले आणि त्यानंतर फलंदाजीच्या जोरावर 17 चेंडूत 33 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पांड्यानं षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. ज्याचा फायदा हार्दिकला आयसीसी टी-20 क्रमवारीत झाला.
मोहम्मद नबी अव्वल स्थानावर
अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (257) टी-20 आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर, बांगलादेशचा शाकिब अल हसन (245) दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर मोईन अली (221), चौथ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल (183) आहे. हार्दिक पांड्या167 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांमध्ये बाबर आझम अव्वल स्थानी
बाबर आझम 810 रेटिंग गुणांसह टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचा सहकारी मोहम्मद रिझवान (796 गुण) येथे दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव (792 गुण) तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम (792 गुण) चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानावर डेव्हिड मलान (731 गुण) आहे.
आयसीसी गोलंदाज क्रमवारीत भुवनेश्वर कुमार टॉप- 10 मध्ये
टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत भुवनेश्वर कुमार आठव्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीच्या टॉप-10 मध्ये तो भारताचा एकमेव गोलंदाज आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा जोस हेझलवूड (792 गुण) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर तबरेज शम्सी (716 गुण) आणि राशिद खान (708 गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. आदिल रशीद (702 गुण) चौथ्या क्रमांकावर आणि अॅडम झाम्पा (698 गुण) पाचव्या क्रमांकावर आहेत.
हे देखील वाचा-