ICC क्रमवारीत टीम इंडियाचा बोलबाला, विराट-रोहितची टॉप 5 मध्ये एन्ट्री, सिराजचे अव्वल स्थान गेले
ICC One Day International Rankings : वनडे विश्वचषकानंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंना फायदा झाल्याचे दिसतेय. मो
ICC One Day International Rankings : वनडे विश्वचषकानंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंना फायदा झाल्याचे दिसतेय. मोहम्मद सिराजला फटका बसलाय. मोहम्मद सिराजची पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. विश्वचषकामध्ये मोहम्मद सिराज जगातील नंबर 1 गोलंदाज होता. पण त्याचे अव्वल स्थान गेलेय. भारताचा स्टार युवा सलामी फलंदाज शुभमन गिल अव्वल स्थानावर कायम आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीने यांनी टॉप 5 फलंदाजामध्ये स्थान पटकावलेय. वनडे क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसत आहे.
फलंदाजांमध्ये शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा टॉप-5 मध्ये आहेत. तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी हे चार भारतीय गोलंदाजांच टॉप-10 गोलंदाजांमध्ये समावेश आहे.वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज 699 रेटिंग गुणांसह तिसऱ्या नंबरवर घरसलाय. दक्षिण आफ्रिकेचे केशव महाराज 741 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. याशिवाय बुमराह 685 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे, कुलदीप यादव 667 रेटिंगसह संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे आणि मोहम्मद शामी 648 रेटिंगसह 10व्या स्थानावर आहे.
फलंदाजीमध्ये भारताचा शुभमन गिल 826 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. माजी कर्णधार विराट कोहली 791 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि कर्णधार रोहित शर्मा 769 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम 824 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. 2023 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कोहली सलग 1258 दिवस एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. विराट कोहली पुन्हा अव्वल स्थान काबिज करणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्याशिवाय कर्णदार रोहित शर्माही पहिल्या स्थानाच्या दिशेना आगेकूच करत आहे. श्रेयस अय्यर याने 12 व्या स्थानावर झेप घेतली आहे. विश्वचषकात त्याने 500 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत.
Virat Kohli has made a push to dethrone his compatriot as the No.1 ODI batter 👀
— ICC (@ICC) November 22, 2023
The latest changes in the @MRFWorldwide ICC Men's Player Rankings following the conclusion of #CWC23 👇https://t.co/RYJbtXlMD2
विराट कोहलीने विश्वचषकात 700 पेक्षा जास्त धावा जमवल्या आहेत. विराट कोहलीने मुंबईमध्ये वनडे क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावले होते. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा होता. विराट कोहलीने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात शतक ठोकत सचिनचा विक्रम मोडीत काढला.