एक्स्प्लोर
Pankaja Munde Factory : पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार? कारखाना विक्रीमुळे रविकांत तुपकर आक्रमक
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Vaidyanath Sugar Factory) विक्रीच्या वादामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'पंकजा मुंडेंनी सुरुवातीला भाडेतत्त्वावर दिलेल्या कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे,' असा थेट आरोप रविकांत तुपकरांच्या संघटनेने केला आहे. हा कारखाना सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विकल्याचा दावा करत, या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी संघटनेने सुरू केली आहे. हा व्यवहार कवडीमोल दरात करून बँकेचे कर्ज बुडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही संघटनेने केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















