एक्स्प्लोर

ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका नव्हे, भारतात रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा?; आयसीसी लवकरच मोठा निर्णय घेणार

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा भारतात आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी आता ‘हायब्रिड मॉडेलवर’ खेळवली जाईल असं सांगण्यात येत होतं. यावेळी दक्षिण अफ्रिका किंवा दुबईत टीम इंडियाचे सामने आयोजित केले जाऊ शकतात, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद भारताला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

पाकिस्तानने जर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेतली तर अशा परिस्थितीत संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाऊ शकते. अलीकडे, दक्षिण आफ्रिकेकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद दिले जाऊ शकते असं सांगण्यात येते होते. परंतु एका अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेचा पर्याय आता संपला आहे, कारण SA20 लीग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही दिवस आधी संपणार आहे. त्यामुळे खेळपट्ट्या लगेच तयार करणे शक्य असणार नाही. याच अहवालात असाही दावा करण्यात आला होता की, जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली किंवा हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला तर त्याचे यजमानपद भारताकडे सोपवले जाऊ शकते. याप्रकरणी बीसीसीआयशीही चर्चा सुरू झाली आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकही सामना किंवा मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात गेलेला नाही. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही गेल्या 29 वर्षांतील पहिली आयसीसी स्पर्धा आहे जी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये 1996  आयसीसीची शेवटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत किती संघ सहभागी होणार?

गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानसह यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे.

संबंधित बातमी:

Virat Kohli: पर्थमध्ये विराट कोहलीचा जलवा कायम, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची आयडिया, थेट झाडावर जाऊन बसले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expand  : दिरंगाई फार, कधी स्वीकारणार पदभार?Special Report prajakta vs Suresh Dhas :प्राजक्ता दुखावली, रडली मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकारSpecial Report Anjali Damania Audio clip : अंजली दमानियांना क्लिप पाठवणारा 'तो' कोण?Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
Embed widget