एक्स्प्लोर

Vaibhav Suryavanshi IPL Rules : 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL कसा खेळला? AGM मध्ये BCCI ला प्रश्न, बदलला नियम

वैभव सूर्यवंशी... अवघ्या 14 वर्षांच्या बिहारच्या या पठ्ठ्यानं 2025 चा आयपीएल सीझन गाजवला.

Vaibhav Suryavanshi IPL Rules : वैभव सूर्यवंशी... अवघ्या 14 वर्षांच्या बिहारच्या या पठ्ठ्यानं 2025 चा आयपीएल सीझन गाजवला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवनं फक्त सात सामने खेळले आणि 252 धावा फटकावल्या. त्यात एक शतक आणि एक अर्धशतक. त्यामुळे अवघ्या क्रिकेटविश्वाची नजर वळली ती या कोवळ्या मुलाकडे. पण रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संजय नाईक यांनी आयपीएलमधल्या खेळाडूंच्या वयोमर्यादेवरुन एक प्रश्न उपस्थित केला. त्यावरुन बराच वेळ चर्चा घडली.

‘14 वर्षांच्या खेळाडूला आयपीएलमध्ये एन्ट्री कशी?’

बीसीसीआयच्या सभेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी संजय नाईक यांनी आयपीएलमध्ये 14 वर्षांच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देणाऱ्या नियमावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले. संजय नाईक यांनी एमसीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 स्पर्धेतल्या नियमाचाही दाखला दिला. एमसीए आपल्या टी20 मुंबई लीगमध्ये 16 वर्षांखालील खेळाडूंना खेळण्यास परवानगी देत नाही. जरी एमसीएकडे युवा खेळाडूंची फौज असली तरीही या स्पर्धेसाठी वयोमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यांच्याकडे भरपूर तरुण खेळाडू उपलब्ध असले तरी. एमसीएच्या सध्याच्या धोरणानुसार 16 वर्षांखालील खेळाडूंना आयपीएलमधून वगळण्यात आले आहे आणि त्यांना फक्त सिनियल लेव्हल टी20 क्रिकेटपुरचं मर्यादित ठेवण्यात आलं आहे.

‘वैभव सूर्यवंशी आयपीएल खेळला कारण...’ 

दरम्यान नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आयपीएल सीईओ हेमांग अमीन यांनी स्पष्टिकरण दिलं. या चर्चेदरम्यान अमीन म्हणाले की, “वैभव सूर्यवंशीला आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात आली याचं कारण तो त्याआधी बिहारकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला होता. कोणत्याही वयोगटातील खेळाडू रणजी करंडक किंवा लिस्ट ए स्पर्धा खेळल्यानंतर आयपीएलसाठी पात्र ठरतो..’’

बीसीसीआयचा नवा नियम काय?

आयपीएलच्या नियमानुसार आता 16 वर्षांखालील 19 वर्षांखालील कोणताही खेळाडू आयपीएल ऑक्शनसाठी नाव दाखल करु शकतो. मात्र त्यासाठी त्या खेळाडूनं किमान एक प्रथम श्रेणी सामना (FIRST CLASS MATCH) किंवा लिस्ट ए (LIST A) सामना खेळणं बंधनकारक आहे. बीसीसीआयच्या या नियमामुळे भविष्यात 16 किंवा 19 वर्षांखालील अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget