एक्स्प्लोर

IND vs SL T20 Series: रोहित शर्मा अनफिट, केएल राहुल नाही तर 'या' खेळाडूला मिळू शकतं श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपद

IND vs SL : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

IND vs SL, T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी समोर येणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित या मालिकेसाठी अनफिट आहे, अशा परिस्थितीत केएल राहुल नाही तर हार्दिक पांड्याकडे टीमची कमान सोपवली जाऊ शकते. केएल राहुल या संघातही नसल्याचं समोर येत आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, "श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित शर्माची बोटाची दुखापत बरी होईल असे सध्या तरी दिसत नाही." अशा परिस्थितीत हार्दिक संघाचे नेतृत्व करेल. केएल राहुलचा विचार केला तर टी20 संघात तो अधिक काळ नसेल असेच दिसून येत आहे. टी-20 विश्वचषकानंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. मात्र, अजूनपर्यंत नवीन निवड समिती स्थापन न झाल्याने जुनी समितीच आगामी मालिकेसाठी संघ जाहीर करणार आहे, असंही या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आलं.

केएल राहुल सुट्टीवर?

केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत तो सात फेरे घेणार आहे. दोघेही जानेवारीतच लग्न करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, रोहित अनफिट झाल्यास, हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेची जबाबदारी स्वीकारू शकतो आणि राहुलला सुट्टीवर जाऊ शकतो.

खराब फॉर्मशी झुंजतोय केएल

आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर केएल राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला तेव्हापासून तो खास फॉर्मात दिसत नाही. त्याच्या बॅटमधून काही वेळाच चांगल्या धावा झाल्या आहेत. गेल्या 6 टी-20 डावांमध्ये त्याचा स्कोअर 5, 51, 50, 9, 9, 4 आहे. केएल राहुलने झळकावलेली शेवटची दोन अर्धशतके झिम्बाब्वे आणि बांगलादेश या कमकुवत संघांविरुद्ध आहेत. त्यामुळं टी20 संघात त्याची जागा जवळपास गेल्याचं दिसून येत आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला एकदिवसीय सामना 3 जानेवारी  वानखेडे स्टेडियम, मुंबई  सायंकाळी 7 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना 5 जानेवारी  एमसीए स्टेडियम, पुणे सायंकाळी 7 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना 7 जानेवारी  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट सायंकाळी 7 वाजता

टी20 मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Embed widget