एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार; रोहित, विराटसह सात खेळाडूंना विश्रांती

India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय.

India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह सात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. हे खेळाडू ऑस्ट्रेलियातून भारतात दाखल होतील. तर, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा 'ब' संघ न्यूझीलंडला रवाना होईल. 

रोहित शर्मा, विराट कोहलीसह सात खेळाडूंना विश्रांती
टी-20 विश्वचषकातू बाहेर झाल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, विकेटकिपर दिनेश कार्तिक, आर आश्विनस, अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी ऑस्ट्रेलियातून थेट मायदेशात परतणार आहेत. या खेळाडूं व्यतिरिक्त संघाच्या संपूर्ण कोचिंग स्टाफलाही न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात विश्रांती देण्यात आलीय. न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

18 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात
टी-20 मालिकेपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याकडं भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेत शिखर धवनं भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्यानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या दौऱ्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 2-0 असा विजय मिळवला होता. 

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 01 December 2024Yugendra Pawar On EVM : युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज, काय म्हणाले? #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 01 December 2024Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Embed widget