Hardik Pandya: भारताची पहिली बॅच अमेरिकेला रवाना,हार्दिक पांड्या कधी जाणार? रोहितसोबत जाऊ शकला नाही कारण....
Hardik Pandya: रोहित शर्मा सोबत टीम इंडियाचे काही खेळाडू टी-20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला रवाना झाले. मात्र, त्यांच्यासोबत हार्दिक पांड्या दिसून आला नाही.
Hardik Pandya Divorce नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमची पहिली तुकडी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. रोहित शर्मासोबत रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादवसोबत काही खेळाडू मुंबईतून काल अमेरिकेला रवाना झाले. भारताचा टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना 5 जूनला होणार आहे. त्यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना 1 जूनला होणार आहे. रोहित शर्मासह काही खेळाडू पहिल्या फेरीत अमेरिकेला रवाना झाले असले तरी हार्दिक पांड्या, (Hardik Pandya) विराट कोहली आणि संजू सॅमसन अजूनही अमेरिकेला रवाना झालेले नाहीत. काही रिपोर्टनुसार या तीन खेळाडूंनी उशिरानं अमेरिकेला जाण्यासाठी बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.
हार्दिक पांड्या रोहित शर्मासोबत का गेला नाही?
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातबाबत समाज माध्यमांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत. माध्यमातील रिपोर्टसनुसार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी अधिकृतपणे भाष्य केलं नाही. नताशा स्टॅनकोविक काल मुंबईत एका मित्रासह दिसून आली. यावेळी तिला घटस्फोटांच्या चर्चांबाबत विचारलं असता तिनं अधिक भाष्य केलं नाही. हार्दिक पांड्या सध्या लंडनमध्ये असून तिथूनचं तो अमेरिकेला रवाना होईल, अशी माहिती आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी मे 2020 मध्ये लग्न केलं होतं. ते दोघे मुंबईत एका पार्टीत भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं. आता नताशा स्टॅनकोविकनं तिच्या आडनावातून पांड्या हटवल्यानं घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, हार्दिक पांड्यानं याबाबत अधिकृत वक्तव्य केलं नाही.
विराट कोहली आणि संजू सॅमसन देखील रोहित शर्मासोबत पहिल्या बॅचमध्ये अमेरिकेला रवाना झाले नाहीत. द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार कोहली, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांनी काही दिवसानंतर अमेरिकेला जाण्यासंदर्भात बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. विराट कोहली 30 मे रोजी अमेरिकेला रवाना होऊ शकतो. त्यामुळं तो 1 जूनला बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात देखील खेळताना दिसणार नाही. तर, संजू सॅमसन नेमका कधी अमेरिकेला जाणार यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही.
भारतीय क्रिकेट संघ 5 जून रोजी आयरलँड,9 जूनला पाकिस्तान, 12 जून अमेरिका आणि कॅनडा विरुद्ध ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना खेळणार आहे.
संबंधित बातम्या :