नताशा अन् हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलची पोस्ट, डेटिंगवरही रोखठोक बोलली!
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: रशियन मॉडेल मॉडेल अलिना टुटेजाने तिच्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
![नताशा अन् हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलची पोस्ट, डेटिंगवरही रोखठोक बोलली! Hardik Pandya Natasha Stankovic Divorce Russian model model Alina Tuteja has posted some pictures with Hardik Pandya on her social media नताशा अन् हार्दिक पांड्याच्या घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलची पोस्ट, डेटिंगवरही रोखठोक बोलली!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/11/29d6458fff23dc4622a9531d724edb3d1720672139937987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच (Natasha Stankovic) यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे.
हार्दिक पांड्या सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियासाठी हार्दिकची चमकदार कामगिरी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घटस्फोटाच्या बातम्यांमुळे तो सतत चर्चेत असतो. टी-20 विश्वचषकात हार्दिक टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा ठरला. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या एका फोटोने खळबळ उडवून दिली असून, त्यात तो एका रशियन मॉडेलसोबत दिसत आहे.
रशियन मॉडेल मॉडेल अलिना टुटेजाने तिच्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. टीम इंडियाच्या विजयानंतर अलीनाने हे फोटो शेअर केले होते. हे सर्व फोटो एका जुन्या जाहिरातीतील आहेत, ज्यामध्ये हार्दिक पांड्या एका मॉडेलसोबत दिसत आहे. 7 दिवसांपूर्वी अलीनाने तीन फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
हार्दिकसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर काय म्हणाली?
अलीनाने हार्दिकसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांना साफ नकार दिला. त्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारासोबतचा फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन देत अलीनाने लिहिले होते, मी कोणालाही डेट करत नाही.
दोघांमध्ये काहीच आलबेल नाही-
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, असा दावा केला जातोय. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या अफवेला हवा मिळाली होती. नताशाने हार्दिकसाठी विश्वचषक जिंकल्याची कोणतीही पोस्ट केलेली नाही. या विजयावर नताशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, हार्दिकच्या मेहुण्याने, म्हणजेच मोठा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. पोस्ट शेअर करत हार्दिकने पंखुरी शर्माला आपला आधारस्तंभ असं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)