India vs Oman : संजूचा कॅच सुटला, पण हार्दिक पांड्या फसला; स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
India vs Oman Asia Cup 2025 : ओमानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारली. तो फक्त 1 धावेवर बाद झाला. त्याच्या बाद झाल्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

India vs Oman Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि ओमान संघ खेळत आहेत. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून सुपर फोर टप्प्यासाठी आधीच पात्रता मिळवली आहे. या सामन्यात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या फक्त 1 धावेवर बाद झाला.
I've never seen a more unlucky cricketer than Hardik Pandya 💔 pic.twitter.com/ojDlyWyzU1
— RISHAV (@Imrishav108) September 19, 2025
संजूचा कॅच सुटला, पण हार्दिक पांड्या फसला
आशिया कप 2025 मध्ये ओमानविरुद्ध हार्दिक पांड्या स्पर्धेत पहिल्यांदाच फलंदाजी करत होता, पण तो दुर्दैवी ठरला. नॉन-स्ट्रायकर एंडवर ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने त्याला धावबाद केले. खरं तर, भारतीय डावाच्या आठव्या षटकात ओमानचा गोलंदाज जितेन रामानंदीने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर अभिषेक शर्माला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने हवेत सरळ शॉट मारला.
I've never seen a more unlucky cricketer than Hardik Pandya 💔 pic.twitter.com/ojDlyWyzU1
— RISHAV (@Imrishav108) September 19, 2025
जितेनने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या हाताऐवजी स्टंपवर आदळला. यादरम्यान, नॉन-स्ट्रायकर एंडवर हार्दिक पांड्या क्रीजच्या बाहेर पडला होता आणि जेव्हा चेंडू स्टंपवर आदळला, तेव्हा तो क्रीजच्या आत पोहोचू शकला नाही. धावबाद झाल्यानंतर, हार्दिक पांड्या पॅव्हेलियनमध्ये रवाना झाला.
भारताने 20 षटकांत केल्या 188 धावा
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 188 धावा केल्या. टीम इंडियाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक खेळी केली. त्याने 45 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावा केल्या. त्याने 15 चेंडूत 38 धावांची तुफानी खेळी केली. मधल्या फळीत अक्षर पटेलने 26 धावा आणि तिलक वर्माने 29 धावा केल्या.
All batters chip in to take India to a competitive total 💪
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 19, 2025
Watch #INDvOMA LIVE now on the Sony Sports Network TV channels & Sony LIV. #SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/7M5S3DSvag
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, ओमानकडून शाह फैसलने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले. जितेन रामानंदनीनेही 4 षटकांत 2 बळी घेतले, तर आमिर कलीमनेही 2 बळी घेतले. दोन भारतीय फलंदाज धावबाद झाले.
हे ही वाचा -





















