Harbhajan Singh : 'हाथी चले बजार पालतू कुते भौंके हजार...' हरभजन सिंगच्या टार्गेटवर नक्की कोण? सोशल मीडियावर खळबळ
माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
Harbhajan Singh Paid Dogs Bark Post : माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग आता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. दरम्यान, तो एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. खरंतर, या पोस्टमध्ये तो खूप रागावलेला दिसत आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले. भज्जीने त्याच्या पोस्टमध्ये हिंदीमध्ये एक म्हण लिहिली आहे.
हरभजन सिंगने X वर लिहिले की, "हाथी चले बजार पालतू (Paid) कुते भौंके हजार." पण, भज्जीने ही पोस्ट का आणि कोणाबद्दल केली हे स्पष्ट झाले नाही. चाहत्यांनी कमेंट्सद्वारे भज्जीच्या या पोस्टमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीही स्पष्ट झाले नाही. पण, हे लक्षात घेण्यासारखे आहे की भज्जीची ही पोस्ट बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला 1-3 असा पराभव पत्करावा लागला त्यानंतर आली आहे.
हाथी चले बजार
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 9, 2025
पालतू ( paid) कुते भौंके हजार
वर्षाच्या सुरुवातीला हरभजन सिंग संघाच्या सुपरस्टार कल्चरबद्दल बोलला होता. खरंतर, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. यासह, भारताने 10 वर्षांनी ही ट्रॉफी गमावली. या पराभवानंतर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. संघाचे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पराभवानंतर हरभजनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सुपरस्टार संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तो म्हणाला होता, "एक सुपरस्टार कल्चर निर्माण झाली आहे. जे संपले पाहिजे. आपल्याला सुपरस्टार्सची गरज नाही, तर कामगिरी करू शकणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. जर तसे झाले तर संघ पुढे जाईल."
याआधी सिडनी कसोटी सामन्यात रोहितने स्वतःला प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवल्यानंतर एका युजरने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, कोणता नेता आपला संघ असा सोडून पळून जातो का? यावर हरभजनने लिहिले की, "मला माहित आहे कोण पळून गेले. मी तुम्हाला आठवण करून देऊ का? आणि तुम्हाला कारण देखील सांगतो. तुमच्या अंगावर काटा येईल." या पोस्टनंतर हरभजन सिंगला सोशल मीडियावर खुप ट्रोल करण्यात आले होते.
मैं जानता हूँ कौन भागा था 😎 याद दिलाऊँ ? कारण भी बताऊँगा . रोंगटे खड़े हो जाएँगे https://t.co/S7wcUbsKNZ
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 4, 2025
हे ही वाचा -