एक्स्प्लोर

Hardik Pandya : कसोटीनंतर हार्दिक पांड्याचा ODI संघातून होणार पत्ता कट? जाणून घ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संभाव्य प्लेइंग-11

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा भारताकडून डावाची सुरुवात करतील हे जवळजवळ निश्चित आहे.

Team India ICC Champions Trophy 2025 Squad : आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर हार्दिक पांड्याने जेव्हा टीम इंडियामध्ये प्रवेश केला, तेव्हा क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास होता की भारताला पुन्हा एकदा कपिल देवसारखा अष्टपैलू खेळाडू मिळाला. सुरुवातीला तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, हार्दिकने कसोटी क्रिकेटपासून स्वतःला दूर केले. आता असे मानले जात आहे की त्याला लवकरच एकदिवसीय संघातूनही वगळले जाऊ शकते.

हार्दिक पांड्या एकदिवसीय संघाबाहेर जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, तो या फॉरमॅटमध्ये पूर्ण 10 षटके टाकू शकत नाही. याशिवाय त्याला सारखी दुखापत होते. पांड्याने ऑक्टोबर 2023 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. एकदिवसीय मालिका येताच, पांड्या ब्रेकवर जातो. दुसरे कारण म्हणजे आता टीम इंडियाला नितीश कुमार रेड्डी याच्या रूपात एक स्फोटक फलंदाजी अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे.

नितीश रेड्डी आल्यामुळे हार्दिक पांड्याला कसोटीत पुनरागमन करण्याच्या आशा मावळल्या आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नितीशने शानदार कामगिरी केली. स्फोटक फलंदाजीव्यतिरिक्त, नितीश 130 च्या वेगाने वेगवान गोलंदाजी देखील करू शकतो. नितीशची गोलंदाजी जसजशी सुधारेल तसतशी टीम इंडियाला पांड्याची गरज कमी होईल.

जर आपण 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोललो तर, हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांचीही 15 सदस्यीय संघात निवड होण्याची अपेक्षा आहे. हार्दिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली संधी मिळण्याची शक्यता आहे. नितीश रेड्डी सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये बेंचवरच राहतील. टीम इंडियासोबत राहून नितीश आपल्या गोलंदाजीत आणखी सुधारणा करू शकतो.

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा भारताकडून डावाची सुरुवात करतील हे जवळजवळ निश्चित झाले. यानंतर, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळतील. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळण्याची अपेक्षा आहे.

सध्या तरी कुलदीप यादव तंदुरुस्त नाही. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे त्याच्यासाठी खूप कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत, मुख्य फिरकी गोलंदाज कोण असेल हे पाहणे मनोरंजक असेल. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला संधी मिळू शकते. मग जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज असू शकतात.

हे ही वाचा -

Manish Pandey Divorce Rumours : चहलनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या नात्यात दुरावा! लवकरच होणार काडीमोड?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात, ठेवीदारांना..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात, ठेवीदारांना..
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूचWalmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात, ठेवीदारांना..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात, ठेवीदारांना..
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
Embed widget