(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup मध्ये रोहित-विराट नाही तर दिनेश-हार्दिक ठरतील टीम इंडियासाठी X Factor, माजी दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया
यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषकाची भव्य स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण-कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल? हे पाहावे लागेल.
Dinesh Karthik and Rishabh Pant : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) ही स्पर्धा येत्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात पाहायला मिळणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी केवळ 4 महिने शिल्लक असताना आता भारतीय संघात नेमकी कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. विविध माजी क्रिकेटपटूही आपआपली मतं देत असून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ग्रेम स्मिथने यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघासाठी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या हे खेळाडू महत्त्वपूर्ण कामगिरी करतील असं भाकित केलं आहे.
Cricket.com शी बातचीत करताना स्मिथने हार्दिक आणि कार्तिक यांचा टी20 विश्वचषकासाठी सर्वात महत्त्वाचे खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. तो म्हणाला, “विश्वचषकापूर्वी अजूनही बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आता बोलणं अवघड आहे. पण सध्यातरी हार्दिक आणि कार्तिक हे दोघेही टी20 विश्वचषक संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. कार्तिक उत्तम फिनीशर तर हार्दिक अप्रतिम ऑलराऊंडर म्हणून समोर आला आहे. त्यामुळे माझ्या मते दोघांची विश्वचषकाच्या संघात जागा नक्कीच बनेल.''
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार प्रदर्शन
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ नुकताच मैदानात उतरला होता. या मालिकेतही कार्तिक आणि हार्दिकने उत्तम कामगिरी केली. पांड्याने 4 डावात 153.9 च्या स्ट्राईक रेटने 117 रन केले. तर पाच ओव्हरही त्याने टाकले. दुसरीकडे कार्तिकने चार डावात 158.6 च्या शानदार स्ट्राईक रेटने 92 रन केले. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश होता. याशिवाय दोघांनीही आयपीएल 2022 मध्येही कमाल कामगिरी केली.
हे देखील वाचा-