एक्स्प्लोर

Gautam Gambhir On India vs Pakistan: भारताविरुद्ध पाकिस्तानने खेळण्यास दिला नकार; गौतम गंभीरला प्रश्न विचारताच काय केलं?, VIDEO

Gautam Gambhir On India vs Pakistan: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या बहुप्रतीक्षित ग्रुप लीग सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला.

Gautam Gambhir On India vs Pakistan: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2026) आपल्या बहुप्रतीक्षित ग्रुप लीग सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला. मात्र, पाकिस्तान सरकारने 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाच्या सहभागाला हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत निवेदनातून समोर आलेला हा निर्णय बांगलादेशला स्पर्धेतून वगळल्याच्या निषेधार्थ केलेला एक राजकीय विरोध मानला जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आपले सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची बांगलादेशची विनंती आयसीसीने फेटाळून लावली होती. दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयावर आयसीसीकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये 2026 च्या टी-20 विश्वचषकात एकमेकांसमोर येणार आहेत. मात्र 15 फेब्रुवारीला भारतविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने जाहीर केला आहे. याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, परंतु गंभीर यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. गौतम गंभीर टी-20 विश्वचषकासाठी मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिल्ली विमानतळावर दिसला. यावेळी माध्यमांनी गौतम गंभीरला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. गौतम गंभीर यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर भारतविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्याचं माध्यमांनी विचारले, यावर गौतम गंभीरने दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेला. (Gautam Gambhir On India vs Pakistan)

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना- (India vs South Africa Match)

भारतीय संघ 2026 च्या टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी एक सराव सामना खेळेल. हा सामना मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल. भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून शेवटचा टी-20 विश्वचषक जिंकला होता. आजपर्यंत कोणत्याही संघाने सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघाला ही कामगिरी करण्याची संधी आहे. गेल्या टी-20 विश्वचषकापासून संघाने त्यांच्या सर्व टी-20 मालिका जिंकल्या आहेत.

7 फेब्रुवारीपासून रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार- (T20 World Cup 2026)

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात, दुसरा स्कॉकटलंड यांच्यात आणि तिसरा भारत आणि अमेरिका यांच्यात होईल. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकाता किंवा कोलंबो येथे होईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी मुंबईत होईल. अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. दोघांमधील पहिली लढत 15 फेब्रुवारी रोजी होईल. विश्वचषकात खेळणारे सर्व 20 संघांना 4 गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 5 संघ असतील.

संबंधित बातमी:

India vs Pakistan Cricketers Reaction : आफ्रिदी–युसूफ बोलले, गावसकर–अश्विन हसले! भारत-पाक वाद पेटला, दोन्ही देशांच्या माजी क्रिकेटपटूंकडून जोरदार प्रतिक्रिया, कोण कोण काय म्हणालं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget