एक्स्प्लोर

माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, भारतीय क्रिकेटवर शोककळा! 

Dattajirao Gaekwad Demise : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं बडोद्यामध्ये निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dattajirao Gaekwad Passes Away : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं बडोद्यामध्ये निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण यानं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. दत्ताजीराव गायकवाड यांनी मुंबई विद्यापीठ आणि बडोद्यात महाराजा सयाजी विद्यापीठाकडून क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. 

दत्ताजीराव गायकवाड यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्यांनी 18.42 च्या सरासरीने 350 धावा केल्या. 1952 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात त्यांनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्यांनी भारतीय संघाची धुरा पाहिली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाला 5-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. दत्ताजी कायकवाड यांनी 1947 ते 1961 यादरम्यान क्रिकेटमध्ये नशीब अजमावले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 14 शतकांची नोंद आहे. महाराष्ट्राविरोधात 249 धावांची खेळी केली होती. 2016 मध्ये दत्ताजीराव गायकवाड भारताचे वयस्कर कसोटी क्रिकेटर झाले होते. त्यांच्याआधी दीपक शोधन भरत सर्वात वयस्कर क्रिकेटर होते. शोधन यांचं वयाच्या 87 व्या वर्षी अहमदाबादमध्ये निधन झालं होतं.  

 दत्ताजीराव गायकवाड यांना क्रिकेटच्या मैदानावर DK म्हणून ओळखलं जायचं. दत्ताजी गायकवाड यांनी 1952 ते 1961 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान गाजवलं होतं.  बचावात्मक फलंदाजी आणि वेळ पडल्यास फटकेबाजी करण्यासाठी दत्ताजी गायकवाड यांना ओळखलं जायचं.  दत्ताजी गायकवाड यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली शानदार कामगिरी केली. 1957-58 या रणजी चषकाच्या हंगामात बडोद्याला जेतेपद मिळवून दिले. हे दशकभरानंतर मिळालेले जेतेपद होते. दत्ताजी गायकवाड यांनी अंतिम सामन्यात सर्व्हिसेसविरुद्धच्या 132 धावा चोपल्या होत्या.  1961 मध्ये चेन्नई ते येथे पाकिस्तान विरुद्धचा शेवटचा सामना खेळले होते. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget