ENG vs IND, 3rd T20, Playing 11 : दीपक हुडाला मिळू शकते संधी, कशी असू शकते अंतिम 11?
IND vs ENG: नॉटींगहमच्या ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट मैदानात आज भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी20 सामना रंगणार असून यावेळी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Team India : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज तिसरा टी20 सामना खेळवला जाणरा आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिले दोन्ही सामने भारताने जिंकल्याने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी भारताने घेतली आहे. दरम्यान आज नॉटींगहमच्या ट्रेन्ट ब्रिज मैदानात तिसरा टी20 सामना रंगणार आहे. यावेळी नेमकी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याकडे अनेकांचे लक्ष्य आहे. कारण दुसऱ्या सामन्यात कमाल फॉर्मात असणाऱ्या दीपक हुडाला संधी मिळाली नव्हती, ज्यानंतर टीम मॅनेजमेंटवर बरेच प्रश्न उठवण्यात आले.
विराट, पंत या दिग्गजांच्या पुनरागमनामुळे दीपक, ईशान, अशा खेळाडूंना बसवले होते. पण आज दीपकला पुन्हा संधी मिळू शकते, यावेळी सूर्यकुमार यादव किंवा ऋषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय गोलंदाजीतही भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल यांना विश्रांती देऊन उमरान मलिक, रवी बिश्नोई या युवांना संधी दिली जाऊ शकते. तर नेमकी भारताची अंतिम 11 कशी असू शकते, यावर एक नजर फिरवूया...
भारताची संभाव्य अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह,उमरान मलिक.
कशी आहे मैदानाची स्थिती?
आज सामना होणाऱ्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना काही प्रमाणात अधिक फायदा होऊ शकतो. ज्यामुळे एक मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. तिनही क्रिकेट प्रकारच्या सामन्यात याठिकाणी मोठी धावसंख्या होताना दिसून आलं आहे. या मैदानावर 2012 मध्ये झालेल्या टी20 सामन्यानंतर थेट 2021 मध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा टी20 सामना पार पडला. तोवर याठिकाणी टी20 सामना पार पडला नव्हता. ज्यानंतर आता पुन्हा एक मोठा आणि महत्त्वाचा टी20 सामना याठिकाणी पार पडणार आहे. फलंदाजांसाठी खेळपट्टी फायद्याची असल्याननाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 2nd T20, Match Highlights : भारताची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी, 49 धावांनी विजय, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी
- Bakri Eid 2022 : भारतीय क्रिकेटपटूंनी साजरी केली बकरी ईद, सिराज, आवेशसह उमरानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारचा नवा विक्रम, पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा पहिलाच गोलंदाज