एक्स्प्लोर

IND vs ENG 2nd T20, Match Highlights : भारताची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी, 49 धावांनी विजय, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी

IND vs ENG : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 49 धावांनी विजय मिळवत मालिकाही खिशात घातली आहे.

IND vs ENG Edgbaston T20 : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 49 धावांनी एक दमदार विजय मिळवत मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य ठेवले. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून भुवनेश्वर, बुमराह, चहलने उत्तम गोलंदाजी केली. या विजयामुळे भारताने  मालिकाही खिशात घातली आहे.

इंग्लंडमधील बर्मिंगहमच्या एजबेस्टन (Edgbaston) मैदानात पार पडलेल्या या सामन्यात आधी दमदार फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन भारतीय खेळाडूंनी घडवलं. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सलामीला भारताकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडी आली. दोघांनीही दमदार खेळीला सुरुवात केली. पण इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहितला 31 धावांवर तंबूत धाडलं. ज्यानंतर पंत (26) आणि कोहली (1) यांना एकाच षटकात ग्लीसननेच माघारी धाडलं. ज्यानंतर भारतीय फलंदाज एका मागे एक बाद होऊ लागले. पण रवींद्र जाडेजाने अनुभवाची कमाल दाखवत 29 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या. 

दरम्यान 171 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर भुवनेश्वरने जेसन रॉयला तंबूत धाडलं. मग एका मागे एक इंग्लंडचे गडी बाद होतच होते. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 आणि डेविड विलीने 33 ही सर्वाधिक धावसंख्या केली. इतर खेळाडू खास कामगिरी करुच शकले नाहीत. भुवनेश्वरने सर्वाधिक 3 गडी यावेळी बाद केले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर पांड्या आणि पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडचा एक गडी धावचीत झाला. 3 षटकात 15 धावा देत 3 गडी बाद करणाऱ्या भुवनेश्वरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....Uddhav Thackeray Speech Daryapur| आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीकाAkhil Chitre Join Shiv Sena UBT | 18 वर्ष पक्षात राहूनही अखिल चित्रेंनी मनसेला केला रामराम! ठाकरे गटात प्रवेश, म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?
Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
Embed widget