VIDEO : RCBच्या फाफने दाखवला IPLचा ट्रेलर, चौकार-षटकारांचा पाऊस, 5.4 षटकात पार केलं टार्गेट
काही दिवसांतामध्ये भारतामध्ये आयपीएलचा रनसंग्राम सुरु होणार आहे. त्याआधीच आरसीबीसाठी (RCB) खूशखबर समोर आली आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात आहे.
Faf du Plessis : काही दिवसांतामध्ये भारतामध्ये आयपीएलचा रनसंग्राम सुरु होणार आहे. त्याआधीच आरसीबीसाठी (RCB) खूशखबर समोर आली आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत फाफ डु प्लेसेस याने गोलंदाजांची धुलाई केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अवघ्या 5.4 षटकात टार्गेट पूर्ण करत आयपीएलचा ट्रेलर दाखवला. हा सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. पण फाफ याने केलेल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.
दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत पावसाने सामना प्रभावित झाला होता. डीएलएसच्या नियमांनुसार, हा सामना फक्त 8 -8 षठकात खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 80 धावा केल्या. फाफ डु प्लेलिसच्या जोहानसबर्ग सुपर किंग्स संघाला 8 षटकात 81 धावांचे आव्हान मिळाले होते. फाफच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 5.4 षटकात हे आव्हान सहज पार करण्यात आले.
फाफ डू प्लेसीचं वादळ, गोलंदाजांची पिटाई -
जोहानसबर्ग सुपर किंग्सकडून फाफ डू प्लेसिस आणि ल्यूस डू प्लॉय यांनी सलामीला वादळी फलंदाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांची पिटाई केली. दोघांनी नाबाद राहात सुपर किंग्स संघाला विजय मिळवून दिला. फाफ आणि ल्यूस यांनी कहिसो रबाडा, कायरन पोलार्ड, सॅम करन यासारख्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आयपीएलचा ट्रेलर दाखवला. 250 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाठलाग केला. फाफ डु प्लेलिस याने 20 चेंडूत 5 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावांचा पाऊस पाडला. ल्यूस डू प्लॉय याने 292 च्या स्ट्राईक रेटने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 14 चेंडूमध्ये 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले.
Joburg Super Kings power duo, du Plessis and du Plooy, making it rain sixes! 💥#Betway #SA20 #WelcomeToIncredible #MICTvJSK pic.twitter.com/5VlpEhJn7g
— Betway SA20 (@SA20_League) January 29, 2024
फाफ डू प्लेसिस आणि ल्यूस डू प्लॉय यांच्या वादळी फलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सची गोलंदाजी दुबळी जाणवली. कायरन पोलार्ड, सॅम करन आणि कसिगो राबाडा यांना विकेट घेण्यात अपय़श आले. या तिन्ही दिग्गज गोलंदाजांची धुलाई झाली. मुंबईने दिलेले 81 धावांचे आव्हान सुपर किंग्सने अवघ्या 5.4 षटकात सहज पार केले. जोहानसबर्ग सुपर किंग्स संघाने 10 विकट आणि 14 चेंडू राखून सामना जिंकला. आरसीबीच्या फाफ ड्यू प्लेसिस याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.