एक्स्प्लोर

World Cup Points Table : इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का, टीम इंडियाचं भविष्य अंधारात, Points Table मध्ये मोठी उलथापालथ

ICC Women Cricket World Cup Points Table 2025 : महिला विश्वचषक 2025 मधील 12व्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 89 धावांनी (England beat Sri Lanka) पराभव करून विजयरथाची हॅट्ट्रिक साधली.

ICC Womens World Cup Points Table Update : महिला विश्वचषक 2025 मधील 12व्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 89 धावांनी (England beat Sri Lanka) पराभव करून विजयरथाची हॅट्ट्रिक साधली. इंग्लंडच्या या धमाकेदार विजयानंतर गुणतालिकेत (ICC Womens World Cup Points Table) मोठी उलथापालथ दिसत आहे, कारण थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का बसला आहे. इंग्लंडने (England Women Team) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, श्रीलंकेला (Sri Lanka Women Team) अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. सलग तीन सामन्यांतील पराभवानंतर तिच्या गळ्यातून विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका वाढला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेसमोर 254 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेची संपूर्ण टीम 45.4 षटकांत 164 धावांवर गारद झाली.

इंग्लंडची विजयाची हॅट्रिक! थेट पहिल्या स्थानावरील संघाला धक्का (ICC Womens World Cup Points Table Update)

महिला विश्वचषक 2025 मध्ये इंग्लंडने सलग तीन विजय मिळवत 6 गुणांसह पहिल्या स्थानी मजल मारली आहे. तिचा नेट रनरेट +1.864 इतका आहे. दुसऱ्या स्थानावर 5 गुणांसह ऑस्ट्रेलिया (Australia Women Team) आहे. ऑस्ट्रेलियाने 3 सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारत (Team India) सध्या तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या खात्यात 3 सामन्यांतून 4 गुण आहेत (2 विजय, 1 पराभव). चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका (South Africa) आहे, जिनेही 3 सामन्यांतून 2 विजय आणि 1 पराभव घेतला आहे, पण तिचा नेट रनरेट -0.888 असल्याने ती भारतापेक्षा मागे आहे. यानंतर गुणतालिकेत अनुक्रमे न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांचा क्रम लागतो. ग्रुप स्टेजनंतर अव्वल चार संघांना सेमीफायनलसाठी पात्रता मिळणार आहे.

भारताकडे अव्वल क्रमांकावर झेप घेण्याची सुवर्णसंधी

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, आज भारतीय संघाला अव्वल क्रमांकावर झेप घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारताने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले असून संघाच्या खात्यात 4 गुण आहेत. मागील सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारावा लागला होता.

आज, म्हणजेच रविवार, 12 ऑक्टोबर, भारताचा चौथा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. जर टीम इंडियाने पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचायचे असेल, तर केवळ विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. भारताने आज ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला, तर त्याच्या खात्यातही 6 गुण होतील. पण इंग्लंडला मागे टाकण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियावर मोठ्या नेट रन रेटने विजय मिळवावा लागेल. पण जर भारताचा पराभव झाला तर भविष्य अंधारात जाईल आणि सेमीफायनलचं समीकरण चुरशीचं होईल.

हे ही वाचा -

Sai Sudarshan Catch : 150 KMH पेक्षा जास्त वेग, डोळे मिटले अन् चेंडू हातात; फलंदाजही स्तब्ध, झेल घेतल्यानंतर साई सुदर्शन मैदानाबाहेर, नेमकं काय घडलं?, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Share Market Avadhut Sathe: मोठी बातमी: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Share Market: शेअर ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंवर सेबीची मोठी कारवाई, शेअर मार्केटमध्ये बंदी, गुंतवणुकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Embed widget