एक्स्प्लोर

Ind vs Eng : इंग्लंडने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला; थेट सेमीफायनलमध्ये मारली एन्ट्री, रोमांचक सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव

England beat India Women’s Cricket World Cup : महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मधील 20वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला.

India Women vs England Women 20th Match : महिला वनडे वर्ल्ड कप 2025 मधील 20वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 बाद 288 धावा केल्या. विजयासाठी भारतासमोर 289 धावांचे आव्हान होते. मात्र, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हे लक्ष्य गाठू शकली नाही आणि अवघ्या 4 धावांनी (England Women won by 4 runs) पराभव स्वीकारावा लागला. स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी जबरदस्त खेळी करूनही भारताला विजय मिळवता आला नाही. हा या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा सलग तिसरा पराभव ठरला. या विजयासह इंग्लंडने सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.

इंग्लंडने सेमीफायनलमध्ये, हीथर नाईटनं ठोकले शतक

पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या टॅमी ब्यूमाँट आणि एमी जोन्स यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडसाठी हीथर नाईटने (Heather Knight) 91 चेंडूत 109 धावांची झळाळती शतकी खेळी केली, ज्यात 15 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. एमी जोन्सने 56, कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंटने 38, तर सलामी फलंदाज टॅमी ब्यूमाँटने 22 धावा केल्या. चार्लोट डीन 19 धावांवर नाबाद राहिली. सोफिया डंकली (15), एम्मा लॅम्ब (11) आणि सोफी एक्लेस्टोन (3) या लवकर बाद झाल्या. भारतासाठी दीप्ती शर्माने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर श्री चरणीने 2 गडी बाद केले.

स्मृती आणि हरमनप्रीतची कामगिरी व्यर्थ 

289 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. प्रतिका रावल 14 चेंडूत फक्त 6 धावा करून बाद झाली. त्यानंतर हरलीन देओलने 31 चेंडूत 24 धावा करत थोडा स्थैर्य आणला. मात्र खरी झळाळी दिसली ती स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या 125 धावांच्या भागीदारीतून. या जोडीने भारतीय विजयाची आशा निर्माण केली होती. पण मानधना बाद झाल्यानंतर संघाचा डाव पुन्हा कोसळला. दीप्ती शर्माने 57 चेंडूत अर्धशतकी (50 धावा) खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिला दुसऱ्या टोकावरून साथ मिळाली नाही. अखेर भारताला अवघ्या 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतासाठी स्मृती मंधाना 94 चेंडूत 88, हरमनप्रीत कौर 70 चेंडूत 70, आणि दीप्ती शर्मा 57 चेंडूत 50 धावा केल्या.

हे ही वाचा -

Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget