एक्स्प्लोर

ENG vs NZ Match : एक सामना… दोन समीकरणं… अन् पाकिस्तानचं टांगणीला लागलेलं स्वप्न! इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड ठरवणार भविष्य

Pakistan Semi-Final Qualification Scenario : पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील प्रवास शुक्रवारीच संपुष्टात येऊ शकतो.

Pakistan Semi-Final Qualification Scenario ENG vs NZ Match : पाकिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील प्रवास शुक्रवारीच संपुष्टात येऊ शकतो. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार असून, या सामन्याच्या निकालावरच पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पूर्णपणे अवलंबून आहेत. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला सुपर 8, ग्रुप-2 मध्ये अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. उलट इंग्लंडने सलग दोन सामने जिंकत आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानचा सुपर 8 मधील शेवटचा सामना शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

समीकरण - 1

जर इंग्लंडने शुक्रवारी न्यूझीलंडचा पराभव केला आणि पाकिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे प्रत्येकी तीन गुण होतील. अशा वेळी निकाल नेट रनरेटवर ठरेल. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल, तर न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागेल आणि पाकिस्तानने स्वतः श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवणे आवश्यक असेल. तेव्हाच तो नेट रनरेटमध्ये कीवी संघाला मागे टाकू शकेल.

समीकरण - 2 

जर न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले, तर पाकिस्तान श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वीच स्पर्धेबाहेर जाईल. कारण गुणतालिकेत तो न्यूझीलंडशी बरोबरी साधू शकणार नाही. तसेच इंग्लंड-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाला, तरीही पाकिस्तानचा मार्ग बंद होईल. जरी त्याने शेवटचा सामना जिंकला तरीही.

न्यूझीलंडने श्रीलंकेवर 61 धावांनी मोठा विजय मिळवत आपला नेट रनरेट +3.050 इतका मजबूत केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना फक्त मोठ्या फरकाने पराभव टाळायचा आहे. दुसरीकडे, इंग्लंड आधीच अंतिम चारमध्ये दाखल झाला असला तरी विजयी लय कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हा सामना न्यूझीलंडसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मात्र पाकिस्तानसाठीही तो तितकाच निर्णायक आहे, कारण याच निकालावर त्यांच्या विश्वचषकातील प्रवासाचा शेवट ठरणार आहे.

भारत आणि विंडिजमध्ये 'करो या मरो'ची लढत

टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केल्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून आपले सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे. मात्र, याच ग्रुपमधून दुसऱ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात काट्याची टक्कर आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज 2 सामन्यांत 2-2 गुणांसह शर्यतीत कायम आहे. 1 मार्चला दोन्ही संघ भिडणार आहेत. जो कोणी सामना जिंकले, तो थेट सेमीफायलनसाठी पात्र होईल.

हे ही वाचा -

Shivam Dube : टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष, पण शिवम दुबेच्या नावावर 'तो' नकोसा विक्रम, वाचून विश्वास बसणार नाही

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget