एक्स्प्लोर

Shivam Dube : टीम इंडियाचा विजयाचा जल्लोष, पण शिवम दुबेच्या नावावर 'तो' नकोसा विक्रम, वाचून विश्वास बसणार नाही

Shivam Dube T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Shivam Dube T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने 256 धावांचा प्रचंड डोंगर उभारला आणि सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. मात्र या शानदार विजयामध्ये काही असे विक्रमही नोंदवले गेले, जे संबंधित खेळाडूंना कदाचित विसरून जावंसं वाटेल. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 बाद 256 धावा केल्या. हा स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्कोअर ठरला, तसेच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा सर्वोच्च धावसंख्या विक्रम बनला.

शिवम दुबेच्या नावावर नकोसा विक्रम 

या मोठ्या विजयावर मात्र शिवम दुबेच्या गोलंदाजीने थोडंसं पाणी फेरलं. त्याने केवळ दोन षटकांत तब्बल 46 धावा खर्च केल्या. 15व्या षटकात त्याला गोलंदाजी देण्यात आली आणि त्या षटकातच त्याने 26 धावा दिल्या. हा भारताकडून टी-20 विश्वचषकात टाकलेला सर्वात महागडा षटक ठरला. याआधी 2007 मध्ये युवराज सिंग याने न्यूझीलंडविरुद्ध एका षटकात 25 धावा दिल्या होत्या.

अभिषेक शर्मा याने 30 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली. त्यानंतर हार्दिक पांड्या याने 23 चेंडूत नाबाद 50 धावा करत डाव रंगवला. शेवटी तिलक वर्मा याने अवघ्या 16 चेंडूत 44 धावा चोपत भारताला 250 पार नेलं. भारताची फलंदाजी इतकी आक्रमक होती की झिम्बाब्वेचे गोलंदाज पूर्णपणे हतबल झाले.

झिम्बाब्वेची झुंज अपुरी

257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. ब्रायन बेनेटने 59 चेंडूत नाबाद 97 धावांची अप्रतिम खेळी केली, पण त्यांना दुसऱ्या टोकावरून हवी तशी साथ मिळाली नाही. कर्णधार सिकंदर रजाने 31 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अर्शदीप सिंग याने 4 षटकांत 24 धावा देत 3 विकेट्स घेतले. तसेच वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल याने प्रत्येकी एक विकेट घेत भारताचा विजय अधिक भक्कम केला.

हे ही वाचा -

Suryakumar Yadav : 256 धावांचा डोंगर, 72 धावांनी विजय... तरीही सूर्यकुमार यादव खेळाडूंवर चिडला, नेमकं काय घडलं?, सामन्यानंतर स्पष्ट बोलला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Nz Final Update : एक ओव्हर अन् सामना उलटा! जेम्स नीशमचा कहर, सॅमसन-ईशाननंतर सूर्याही गारद, कर्णधार शून्यावर OUT, जाणून घ्या LIVE अपडेट्स
एक ओव्हर अन् सामना उलटा! जेम्स नीशमचा कहर, सॅमसन-ईशाननंतर सूर्याही गारद, कर्णधार शून्यावर OUT, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी; फायनलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक, पॉवरप्लेमध्ये ठोकल्या रेकॉर्डब्रेक धावा
काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी; फायनलमध्ये 18 चेंडूत अर्धशतक, पॉवरप्लेमध्ये ठोकल्या रेकॉर्डब्रेक धावा
कोणत्या संघाने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला? न्यूझीलंडची कामगिरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती 
कोणत्या संघाने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला? न्यूझीलंडची कामगिरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती 
IPL 2026 News : टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
टी-20 वर्ल्डकप फायनलदरम्यान आयपीएलची अधिकृत घोषणा! IPL 2026 चा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Embed widget