Virat Kohli: विराट कोहलीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणार का?
ENG vs IND ODI Series: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून मैदानात संघर्ष करताना दिसत आहे.
ENG vs IND ODI Series: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून मैदानात संघर्ष करताना दिसत आहे. यातच इंग्लंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात झालेल्या दुखापतीनं त्याच्या अडचणीत आणखी भर घातली. दुखापतीमुळं त्याला इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामन्याला मुकावं लागलं होतं. एवढेच नव्हे तर, विराट कोहली उर्वरीत दोन एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. यातच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) विराटच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
इंग्लंडविरुद्ध लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहनं त्याच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात नेत्रदीपक कामगिरी केली. या सामन्यात बुमराहनं 19 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या. ज्यानंतर इंग्लंडचा डाव 110 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात भारतानं 10 विकेट्सनं हा सामना जिंकलाय. यानंतर जसप्रीत बुमराहनं पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली.
जसप्रीत बुमराह काय म्हणाला?
"आजचा दिवस चांगला होता आणि त्यानंतर तुमच्यासाठी टाळ्या वाजतात. पण मी असा माणूस आहे, जो कधीच टाळ्यांचा मोहात अडकत पडत नाही. मी जे काही करू शकतो ते प्रयत्न करण्यावर मी नेहमी लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या टाळ्यांबद्दल कृतज्ञ आहे, परंतु मी नेहमीच खेळामध्ये सातत्य शोधण्याचा प्रयत्न करतो." त्यावेळी विराट कोहलीच्या दुखापतीबाबत जसप्रीत बुमराहला विचारला असता तो म्हणाला की, "मला त्याच्या दुखापतीच्या गंभीरतेबाबत माहिती नाही. ज्यामुळं तो पहिला सामना खेळू शकला नाही. आशा आहे की दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो नक्की खेळेल. मला त्याच्या दुखापतीबद्दल खरोखर माहिती नाही."
जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवलाय. भारताच्या विजयात संघाचा वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मोलाटा वाटा उचलला. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनचं आक्रमक गोलंदाजी करत इंग्लंडच्या सहा फलंदाजाला माघारी धाडलं. या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
हे देखील वाचा-