Eng vs Ind 4th Test : कुलदीप अन् जुरेल मँचेस्टरमध्ये खेळणार? 'या' खेळाडूंची सुट्टी, जिंकण्यासाठी कर्णधार गिल घेणार मोठा निर्णय
Eng vs Ind 4th Manchester Test : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या टीम इंडिया पिछाडीवर आहे.

England vs India 4th Test Update : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या टीम इंडिया पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी करण्यासाठी शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील भारतीय संघाला मॅंचेस्टर कसोटी सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. मात्र, या सामन्याआधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
आकाश दीपच्या दुखापतीची चिंता
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाश दीपच्या (Akash Deep) पाठीच्या दुखापतीची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो मँचेस्टर कसोटीत खेळणार की नाही हे सध्या माहित नाही. लॉर्ड्स कसोटीत खेळताना त्याच्या कमरेला दुखापत झाली होती आणि तो लंगडत मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर ओव्हर्स पूर्ण करतानाही त्याला त्रास जाणवत होता. मँचेस्टरमध्ये पोहोचल्यानंतरही त्याच्या दुखापतीत वाढ झाल्याचं समजतंय.
करुण नायरवर बाहेर, ध्रुव जुरैलला संधी?
सध्या खराब फॉर्ममधून जात असलेल्या मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरची (Karun Nair) जागा धोक्यात आली आहे. तिन्ही कसोटीत मिळून त्याने केवळ 131 धावा केल्या आहेत. त्यामुळे आगामी सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरैलला (Dhruv Jurel) संधी दिली जाऊ शकते.
पंत केवळ फलंदाज म्हणून मैदानात?
रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत चौथ्या कसोटीत फलंदाज म्हणून मैदानात खेळताना दिसू शकतो. त्याच्या जागी ध्रुव जुरैलला विकेटकीपिंगची जबाबदारी दिली जाऊ शकते. यासाठी करुण नायरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
कुलदीप यादवची एन्ट्री?
आकाश दीपच्या अनुपस्थितीत स्पिनर कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात स्थान मिळू शकतं. इंग्लंडच्या फलंदाजांविरुद्ध तो प्रभावी ठरू शकतो, असा विश्वास टीम मॅनेजमेंटला आहे.
बुमराहचा पुनरागमन शक्य
या सगळ्या पार्श्वभूमीवर, जसप्रीत बुमराहला मँचेस्टर कसोटीत खेळवण्याची शक्यता अधिक आहे. जर तो फिट असेल, तर त्याचं पुनरागमन संघासाठी मोठा दिलासा असू शकतो. एकंदरीत टीम इंडियासमोर ही कसोटी "करो या मरो"सारखी आहे. त्यामुळे कोणतेही धोके पत्करून, सर्वात तंदुरुस्त आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनाच मैदानात उतरवण्यावर भर दिला जाईल.
हे ही वाचा -
















