एक्स्प्लोर

Eng vs Ind 4th Test : 'शॉकिंग' अपडेट! आधीच दोन वेगवान गोलंदाज जखमी, त्यात बुमराहबद्दल मिळाली वाईट बातमी, आता काय करणार कोच गंभीर?

England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना (IND vs ENG 4th Test) 23 जुलैपासून मॅंचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.

England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना (IND vs ENG 4th Test) 23 जुलैपासून मॅंचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला झालेली दुखापतीने पूर्ण टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढवलंय. अर्शदीप सिंग आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे, आणि आता बर्मिंघम टेस्टमध्ये 10 बळी घेणारा आकाशदीप सिंग देखील फिटनेस समस्यांमुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले असून, लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या डावातही तो या समस्येला सामोरा गेला होता.

बुमराह खेळणार, पण तरीही चिंता कायम

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अर्शदीप आणि आकाशदीपच्या जागी अंशुल कंबोजला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, जसप्रीत बुमराह मॅंचेस्टर टेस्टमध्ये खेळणार आहेत. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट झाले होते की, बुमराह केवळ तीनच सामने खेळणार आहे, त्यामुळे ओव्हलवरील शेवटच्या सामन्यात तो सहभागी होण्याची शक्यता फारच कमी आहे.

या रिपोर्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे, जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप हे दोघे एकत्रितपणे उर्वरित कसोटी सामने खेळणार नाहीत. म्हणजेच, जर बुमराह मॅंचेस्टरमध्ये खेळतो, तर आकाशदीप ओव्हलमध्ये बुमराहच्या जागी खेळेल. परिणामी, भारतीय वेगवान माऱ्याची धार काहीशी कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे टीम इंडियासमोर आणखी आव्हाने उभी राहतील.

आकाशदीप आणि अर्शदीप दोघेही दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे, टीम इंडियाच्या नेट सेशनदरम्यान मोठी अडचण निर्माण झाली. इतकी की, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केललाही सरावात गोलंदाजी करावी लागली. अंशुल कंबोजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव नसल्यामुळे त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळेल की नाही, हे पाहणे रंजक ठरेल. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील आकाशदीपला पाठीच्या दुखण्याचा त्रास झाला होता, त्यामुळे त्याची ही समस्या नवीन नाही.

भारत 1-2 ने पिछाडीवर

तीन सामन्यांनंतर इंग्लंड ही मालिका 2-1 ने आघाडीवर आहे. उर्वरित दोन सामने ओल्ड ट्रॅफर्ड (मॅंचेस्टर) आणि ओव्हल येथे खेळवले जाणार आहेत. भारतासाठी ही मालिका वाचवायची असेल, तर मॅंचेस्टरमध्ये होणारा चौथा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा -

Eng vs Ind 4th Test : चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; अर्शदीप सिंग मालिकेतून बाहेर, 'या' धाकड गोलंदाजाची एन्ट्री

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget